DINK ट्रेंड: 'डबल इनकम, नो किड्स' हा ट्रेंड Gen-Z मध्ये लोकप्रिय आहे

वेगवान आणि स्पर्धात्मक जगात तरुणांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी झपाट्याने बदलत आहे. पारंपरिक ‘लग्न–मुलं–कुटुंब’ या ठराविक चौकटीपलीकडे जाऊन अनेक कपल आता वेगळे निर्णय घेताना दिसत आहेत. ‘डबल इन्कम, नो किड्स’ म्हणजेच DINK ही संकल्पना हळूहळू लोकप्रिय होत असून, विशेषतः Gen-Z पिढी याकडे एक पर्यायी जीवनशैली म्हणून पाहत आहे. (gen z dink lifestyle double income no kids trend)

DINK म्हणजे नेमकं काय?
DINK म्हणजे ‘Double Income, No Kids’ दोघेही कमावणारे पण मुलं न घेण्याचा निर्णय घेतलेले जोडपे. या पद्धतीत आर्थिक स्थिरता, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि कमी जबाबदाऱ्या यावर अधिक भर दिला जातो.

तरुण कपल्स या ट्रेंडकडे का वळत आहेत?

1. वाढती महागाई आणि आर्थिक दबाव
आजच्या काळात मुलांचं संगोपन, शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करणं खर्चिक झालं आहे. त्यामुळे अनेकजण आधी आर्थिक स्थैर्य आणि आरामदायी जीवनाला प्राधान्य देत आहेत.

2. करिअरला दिलं जातंय महत्त्व
Gen-Z पिढी करिअरबाबत अधिक सजग आहे. स्वतःची प्रगती, स्थिरता आणि प्रोफेशनल ग्रोथ यासाठी ते जास्त वेळ आणि ऊर्जा देऊ इच्छितात.

3. मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक स्पेस
सततच्या कामाच्या ताणामुळे मानसिक थकवा वाढतो. त्यामुळे तरुण आता स्वतःसाठी वेळ, शांतता आणि संतुलित जीवनशैली निवडत आहेत.

4. ‘स्लो लिविंग’कडे वाढता कल
पूर्वी ‘हसल कल्चर’ म्हणजे सतत काम करत राहणं लोकप्रिय होतं. पण आता तरुण या धावपळीपासून दूर जाऊन शांत, संतुलित आणि आनंदी आयुष्य जगण्यावर भर देत आहेत.

5. पालकत्वाकडे ‘पर्याय’ म्हणून पाहणं
पूर्वी मुलं होणं ही गरज मानली जायची, पण आता ती एक वैयक्तिक निवड बनली आहे. प्रत्येकजण आपल्या परिस्थितीनुसार निर्णय घेत आहे.

भारतात कुटुंब आणि मुलांना मोठं महत्त्व दिलं जातं. मात्र बदलत्या काळानुसार विचारसरणीतही बदल होत आहे. आजची पिढी पारंपरिक अपेक्षांपेक्षा स्वतःच्या आयुष्याच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व देत आहे. ‘डबल इन्कम, नो किड्स’ ही फक्त एक ट्रेंड नसून, आजच्या पिढीची बदलती जीवनशैली आणि विचारसरणी दर्शवणारी संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य कसं जगायचं याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, आणि Gen-Z हा अधिकार ठामपणे वापरताना दिसत आहे.

Comments are closed.