शिव जलाभिषेक : शिव जलाभिषेकाचे महत्त्व काय?

सर्व देवांमध्ये महादेवाला अधिक श्रेष्ठ मानले जाते. शिवाची अनेक रूपे आहेत. हिंदू धर्मात भगवान शिवाला मानणारा मोठा जनसमुदाय असल्याने दररोज भगवान शिवाची मनोभावे पूजा करणारे बरेच लोक आहेत. पूजा करताना शिवाच्या विशिष्ट मंत्राचा जप किंवा स्त्रोत पठण करण्यात येते. तसेच शिवपूजनात जलाभिषेक करण्याला विशेष महत्त्व आहे. पण यामागचं कारण काय आहे ? पाण्याशिवाय शिवालाकोणत्या पदार्थांनी अभिषेक करणे शुभ असते? जाणून घेऊयात या सर्व प्रश्नांची उत्तरे,

जलाभिषेक महत्त्वाचा का?

असं म्हणतात की, जेव्हा समुद्र मंथन झाले होतं त्यावेळी महादेवांनी मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केलं होतं. विषप्राशनामुळे त्यांना असंख्य वेदना झाल्या. त्यांचे शरीर आणि मस्तक प्रचंड गरम झाले होते. त्यांची ही आग शांत करण्यासाठी देवतांनी त्यांच्यावर जल, दूध आणि इतर शीतल पदार्थ अर्पण केले, ज्यामुळे त्यांना आराम मिळाला. तेव्हापासून शिवाच्या पूजेत जलाभिषेक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याशिवाय असे सांगितले जाते की शिव हे वैरागी आहे. जलाभिषेकामुळे त्यांना शीतलता प्रदान होते, ज्यामुळे त्यांची उग्रता कमी होऊन ते शांत राहतात.

जलाभिषेक करताना करावे ‘या’ मंत्राचे पठण

ॐ आम्ही तुम्हाला त्रिगुणात्मक देवी अर्पण करतो, जी सुगंधी आहे आणि शुभत्व वाढवते.
मला अमृतापासून उर्वरुकाप्रमाणे मृत्यूच्या बंधनातून मुक्त कर

ओम नमः शिवाय ll

जलअर्पण करण्यासाठी शुभ धातू

पुराणानुसार शिवाच्या पिंडीवर जल अर्पण करण्यासाठी सोने, चांदी आणि तांब्याचे भांडे सर्वात शुभ मानले जातात.

पाण्याशिवाय या पदार्थांनी करता येईल अभिषेक

दूध – गायीच्या दुधाचा अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं केल्याने संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते.

मोहरीचे तेल – शत्रूंपासून मुक्ती मिळण्यासाठी मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा.

मध – शिव पिंडीवर मध अर्पण केल्याने एखाद्याचे मन अधात्माकडे झुकते असं सांगितलं जात.

दही – दह्याने अभिषेक केल्यास आयुष्यातील अडथळे दूर होतात.

हेही वाचा – Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला राशीनुसार करावीत ही कामे, होईल लक्ष्मीची कृपा

Comments are closed.