Asha Bhosle : आशा भोसले यांना झालेला मल्टी ऑर्गन फेल्युअर आजार नेमका काय?

भारताच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी (ता 12 एप्रिल) वयाच्या 93 व्या वर्षी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. प्रकृती अधिक बिघडल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, रविवारी त्यांचं निधन झालं. दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलं आहे.

निधनाचे कारण

ANI च्या वृत्तानुसार आशा ताईंवर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार विविध अवयवांनी काम करणे थांबवल्यामुळे (multiple organ failure) त्यांचे निधन झाले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयाच्या आप्तकालीन वैद्यकीय सेवा विभागात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतू, अखेरीस त्यांच्या शरीराने साथ सोडली. अशा माहिती डॉ. प्रतीक समदानी यांनी दिली आहे.

Multiple Organ Failure म्हणजे काय?

जेव्हा शरीरातील दोन पेक्षा अधिक अवयव निकामी होतात तेव्हा त्याला ‘मल्टिपल ऑर्गन फेल्युअर’ म्हणतात. हा आजार वेदनादायी असतो. जाणून घेऊयात हा आजाराविषयी संपूर्ण माहिती.

लक्षणे –

  • तीव्र थकवा आणि अशक्तपणा
  • ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा
  • शरीराच्या आतील भागांना सुज
  • रक्ताच्या गुठळ्या होणे
  • शरीर थंड पडणे
  • श्वास घ्यायला त्रास होणे
  • अंगदुखी
  • लघवीला त्रास होणे
  • त्वचा निस्तेज दिसणे
  • मळमळ आणि उलट्या

कारणे

संसर्ग – तीव्र संसर्गामुळे शरीराचा दाह होऊन अवयव निकामी होऊ शकतात.

दीर्घकालीन आजार – अनियंत्रित डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर यामुळे किडनी आणि हृदयावर ताण येऊन ते निकामी होतात.

रक्तपुरवठा कमी होणे – हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकमुळे अवयवांना ऑक्सिजन न मिळाल्यास ते निकामी होऊ शकतात.

व्यसन – अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे यकृत आणि किडनी निकामी होते.

अपघात किंवा इजा – गंभीर अपघात किंवा मोठ्या रक्तस्त्रावामुळे शरीरातील अवयव निकामी होतात.

उपाय

विज्ञानात कायमच नवनवीन संशोधन होत असल्याने मल्टीपल ऑर्गन फेल्युअर आजार आटोक्याl येऊ शकतो. जर तुम्हाला वरील लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांकडे धाव घ्या आणि चाचण्या करून शरीरात काय बदल होत आहेत हे तपासा आणि उपचार घ्यावेत.

हेही वाचा – Asha Bhosle Pass Away : सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं कुटुंब किती मोठं; जाणून घ्या सविस्तर माहिती

Comments are closed.