Asha Bhosle : आशाताई कायम पांढरी साडीच का नेसायच्या? वाचा यामागील रंजक कारण
भारताच्या संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी (ता 12 एप्रिल) वयाच्या 93 व्या वर्षी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रकृती अधिक बिघडल्यामुळे आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, रविवारी 12 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे अनेक किस्से आता चर्चेत आहेत, ज्यामध्ये त्या नेहमी सफेद साडी का नेसायच्या? हे देखील आहे.
लतादीदींसोबत खास किस्सा
जेव्हा आशाताई कपल ऑफ थिंग्ज या पॉडकास्टवर आल्या होत्या, तेव्हा त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतच्या आपल्या नात्याची आठवण सांगितली होती. तेव्हा आशाताईंनी त्या आणि लतादीदी कायम पांढऱ्या साड्या का नेसत असत याबद्दल सांगितलं होतं. आशाताई म्हणाल्या होत्या की, “दीदी आणि मी नेहमी पांढऱ्या साड्या नेसायचो. पांढरा रंग आमच्या त्वचेवर जास्त शोभेल असं वाटायचं. जर आम्ही इतर रंग नेसले तर कदाचित सावळ्या दिसू असं वाटायचं.” पुढे त्या असं म्हणालेल्या की, नंतर, मी गुलाबी साड्या घालायला सुरुवात केली आणि दीदी माझ्याकडे तिरस्काराने बघायची. पण हळूहळू, मी गुलाबी रंगासोबत इतर रंगही घालायला सुरुवात केली.”
संगीतसृष्टीतील अलौकिक व्यक्तिमत्व
मागील आठ दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट संगीतसृष्टीतील अलौकिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले वयाची 90 उलटल्यावरही त्याच उत्साहाने कार्यरत होत्या. आशा भोसले यांचा आवाज आणि त्यासोबतच आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांनी रचलेली गाणी आजही लोकांच्या मुखी आहेत. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी गाणी आशा भोसले यांनी सुपरहिट केलीत. त्यांनी केवळ हिंदीतच गाणी गायली नाही तर त्यांनी मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
हेही वाचा – Asha Bhosle : आशा भोसलेंच्या शेवटच्या पोस्टने वेधले लोकांचे लक्ष, वाचून तुम्हालाही बसेल धक्का
Comments are closed.