Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना केले अभिवादन; पाहा फोटो
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आज (14 एप्रिल) महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तसेच महामानव आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दरवर्षीप्रमाणे दादर येथील चैत्यभूमीला आंबेडकरांचे अनुयायी भेट देत असतात, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक, ‘राजगृह’ निवासस्थान आणि संबंधित परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांनी आणि नेत्यांनी चैत्यभूमी येथे जात आंबेडकरांना अभिवादन केले.
Comments are closed.