Plastic Straw : स्ट्रॉ ने ज्यूस पिता? ही सवय शरीरासाठी ठरू शकते हानिकारक




स्ट्रॉ ने ज्यूस पिता? शरीरासाठी ठरू शकते हानिकारक


वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असून सतत तहान लागत आहे. तहान भागवण्यासाठी रस्त्यात एखादे ज्यूस सेंटर किंवा कानिफनाथ रसवंती येथे थांबून फळांचा ज्यूस पिण्यात येत आहे. ज्यूसचा एक घोटचं या गरमीपासून दिलासा देणारा असतो. ज्यूस काचेच्या ग्लासात मिळतो आणि त्यासोबत स्ट्रॉ देखील देण्यात येतो. बाहेरील ज्यूस थेट ग्लासाला तोंड लावून पिण्यापेक्षा स्ट्ऱॉने पिण्यास अधिक प्राधान्य देण्यात येते. परंतू, प्रत्येक वेळेस किंवा स्ट्रॉने ज्यूस पित असाल तर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

दातांच्या समस्या

स्ट्रॉने ज्यूस पिऊन आपण दातांच्या समस्यांना नकळत आमंत्रणच देतो. स्ट्रॉने ज्यूस पिताना ज्युसमधील साखरेचा दातांच्या विशिष्ट भागावर थेट मारा होतो. परिणामी दातांमध्ये कॅव्हिटीज निर्माण होऊन दात किडण्याची शक्यता वाढते.

सुरकुत्या

सतत स्ट्रॉच्या सहाय्याने ज्यूस प्यायल्याने चेहर्‍यावर सुरकुत्या येतात.

पचनाच्या समस्या

स्ट्रॉने पिताना पेयासोबत थोडी हवाही पोटात जाते, ज्यामुळे पोट फुगल्यासारखे वाटू शकते.

प्लास्टिकचा धोका

अनेक प्लास्टिकच्या स्ट्रॉमध्ये हानिकारक रसायने असतात, जी दीर्घकाळ शरीरात गेल्यास कॅन्सरचा धोका किंवा हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतात

हेही वाचा – Kitchen Tips: थर्मासमधला चहा किती वेळ चांगला राहतो?



Comments are closed.