स्वप्नात स्वत:चे लग्न पाहणे, कशाचे संकेत?
‘मनी वसे तेच स्वप्नी दिसे’ असे म्हटले जाते. पण कधी कधी आपण ज्या गोष्टींचा विचारही कधी केलेला नसतो अशा काही गोष्टी आपल्याला स्वप्नात पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का की स्वप्नशास्त्रानुसार आपल्याला पडणाऱ्या प्रत्येक स्वप्नामागे काही गूढ संकेत दडलेला असतो. यानुसार जर तुम्ही महीला किंवा पुरुष असाल आणि तुम्हाला स्वप्नात स्वत:चे लग्न दिसले तर त्यामागेही काही संकेत आहे हे समजून जावे.
स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्ही विवाहीत आहात तरीही तुम्हाला तुमचा विवाह होत असल्याचे स्वप्न पडले असेल तर त्याचा अर्थ तुमच्या वैवाहीक आयुष्यात तणाव वाढला आहे. यामुळे अशावेळी नातं जपणं महत्वाचे असल्याचा हा संकेत आहे.
जर स्वप्नातल्या विवाहात तुम्ही नवरदेव बनून घोड्यावर बसलेले असाल तर तुमचा उत्कर्षाचा काल सुरू होणार असल्याचे ते संकेत आहेत असे समजावे.
जर तुम्हाला स्वप्नात स्वत:ला हळद , मेंहदी लावली जात असल्याचे दिसले तर हा तुमच्यासाठी शुभ क्षण आहे असा याचा अर्थ होतो. याचाच अर्थ तुमच्या नवीन प्रवासाची, कामाची , व्यवसायाची ही नवीन सुरुवात आहे.
जर तुम्ही महिला असाल आणि लग्नानंतर सासरला निघालेल्या वधूच्या वेशभूषेत तुम्ही स्वत:ला स्वप्नात पाहीले असेल तर हे शुभसंकेत आहेत असे समजा. सुख समृद्धी आणि धनलाभाचे, शुभकार्याचे हे संकेत आहेत.
पण जर लग्नानंतर सासरला निघालेल्या वधूच्या वेशभूषेत तुम्ही स्वत:ला स्वप्नात जोरजोरात रडताना पाहीले असेल तर मात्र भविष्यात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार याचे हे संकेत आहेत. असा याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्हाला भविष्यात जागरुक राहणे महत्वाचे आहे.
Comments are closed.