Relationship Advice: चॅट करताना ‘हे’ शब्द वापरताय? सावधान!
हल्ली कोणत्याही नात्यांमधला मोठा संवाद हा मोबाईलच्या स्क्रीनवरच घडतो. मेसेज, चॅट, रिप्लाय सगळं काही काही सेकंदांत होतं. पण या जलद संवादात एक मोठी गोष्ट हरवते, ती म्हणजे भावना समजण्याची क्षमता. समोरचा व्यक्ती हसतोय, रागावला आहे की दुखावला आहे हे चॅटमधून कळणं कठीण असतं. अशा वेळी आपण वापरणारे साधे शब्दही नात्यात गैरसमज निर्माण करू शकतात. कधी नकळत पाठवलेला एक छोटा मेसेजही समोरच्याला दुखावू शकतो. (chat words affect relationship communication mistakes)
हे शब्द वापरत असाल तर सावध रहा:
1. ‘ठीक आहे’ / ‘OK’
कोणीतरी मनापासून काही सांगत असताना तुम्ही फक्त ‘OK’ किंवा ‘K’ असा रिप्लाय दिलात, तर तो साधा आणि उदासीन वाटतो. समोरच्याला वाटू शकतं की तुम्हाला त्यांच्या बोलण्यात काडीचाही रस नाही.
2. ‘तुला जे वाटतंय ते’ (Whatever)
हा शब्द संवाद थांबवण्यासारखा असतो. यातून नकळत “मला काही फरक पडत नाही” असा संदेश जातो. नात्यातील सहभाग कमी झाल्यासारखं वाटू शकतं.
3. ‘काही नाही’ (Nothing)
मनात काहीतरी असताना ‘काही नाही’ म्हणणं हे गैरसमजांना आमंत्रण देतं. समोरची व्यक्ती अधिक गोंधळते आणि नात्यात अनपेक्षितरित्या दुरावा वाढतो.
4. ‘तू नेहमीच असंच करतोस/करतेस’
‘नेहमी’ किंवा ‘कधीच नाही’ असे शब्द अतिशयोक्ती दर्शवतात. त्यामुळे समोरची व्यक्ती बचावात्मक होते आणि छोटा विषयही मोठ्या वादात बदलतो.
5. ‘नंतर बोलू’ आणि गायब होणं
अचानक चॅट थांबवणं किंवा तासन्तास रिप्लाय न देणं यामुळे समोरच्याला असुरक्षित वाटू शकतं. याला ‘डिजिटल सायलेन्स’ म्हणतात, जो मानसिक ताण वाढवतो. किंवा नातं नको आहे म्हणून तो/ती असा वागत असेल किंवा मला इग्नॉर करतोय का अशी भावना निर्माण होते.
नातं टिकवण्यासाठी काय कराल?
– चॅट करताना थोडं सजग राहणं गरजेचं आहे.
– इमोजीचा योग्य वापर केल्याने वाक्याचा टोन स्पष्ट होतो आणि गैरसमज टाळता येतात.
– नुसतं एक शब्द न लिहिता थोडं सविस्तर उत्तर दिल्यास समोरच्याला आपलेपणा जाणवतो.
– महत्त्वाचे किंवा संवेदनशील विषय चॅटवर न बोलता फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलल्यास गैरसमज कमी होतात.
नातं मजबूत ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींपेक्षा लहान सवयी अधिक महत्त्वाच्या असतात. चॅटमधले साधे शब्दही नात्यावर मोठा परिणाम करू शकतात.
म्हणून पुढच्या वेळी मेसेज टाइप करताना एकदा विचार करा हा शब्द समोरच्याला कसा वाटेल? कारण कधी कधी एक छोटा मेसेजही नात्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो.
Comments are closed.