सोशल मीडियावर मुलांचे फोटो, संकटाला आमंत्रण





आजच्या डिजिटलच्या जमान्यात आपल्या आयुष्यातील खास क्षण सगळ्यांसोबत शेअर करण्याचा ट्रेंड वाढत आहे. आपला आनंद इतरांना दाखवताना अनेकजण व्हॉट्सअप,फेसबुक, इन्स्टाग्रामवर त्या आनंदाच्या क्षणाचे फोटो, पोस्ट शेअर करतात. ते बघून अनेकजण त्यावर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस करतात हे बघून अनेकांचे समाधान होते. पण खरं तर तुमचे हे बेजबाबदार वागणे तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. कारण तुम्ही आनंद घेत असलेल्या इंटरनेटची एक वेगळी काळी दुनियाही आहे जी तुमच्या प्रत्य़ेक पोस्टवर, फोटोवर लक्ष ठेवून आहे हे तुम्हाला कळायला हवं.

तुम्ही जेव्हा कोणतीही पोस्ट किंवा फोटो सोशल मीडियावर टाकता. तेव्हा ती तुमची राहत नाही तर सार्वजनिक होते. तुम्ही शेअर करत असलेल्या पोस्टमधून तुम्ही तुमचीच नाही तर तुमच्या कुटुंबाची मुलांची संपूर्ण माहीतीच जगप्रसिद्ध करत असता. त्यामुळे तुमच्या मुलांची सगळी कुंडलीच समोरच्याच्या हातात देत असता. या माहीतीवरून एखादी वाईटवृत्तीची व्यक्ती मुलांपर्यंत, कुटुंबातील इतर व्यक्तीपर्यंत सहज पोहचू शकते. प्रसंगी त्यांच्यासाठी धोकादायकही ठरू शकते. य़ातून कोणते धोके निर्माण होऊ शकतात ते प्रत्येकाला माहीत असायलाच हवे.

डिजिटल अपहरण
आज आपल्या आजूबाजूला डिजिटल किडनैपिंगच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. अशावेळी तुमच्या मुलांचे फोटो गुन्हेगार गुन्ह्यासाठी वापरू शकतो. तुम्ही केलेल्या पोस्टमधील माहीतीवरून त्याने तुमचाच नाही तर संपूर्ण कुटंबाचा प्रोफाईल आधीच अभ्यास करून ठेवलेला असतो. त्याचा वापर तो चुकीच्या गोष्टींसाठीदेखील करू शकतो.

स्थान
जर तुम्ही कुठे आहात, किंवा मुलं कोणत्या शाळा कॉलेजात शिकतात, कोणत्या क्लासला जातात हे जरी तुम्ही पोस्टमध्ये सांगितल असेल तरी गुन्हेगाराला तुमच्या मुलांचे लोकेशन सहज कळू शकतं.

गडद वेब
मुलांच्या फोटोचा गैरवापर केला जातो. ते मॉर्फ करून डार्क वेबवर विकले जातात. त्यावरून अशा व्यक्ती तुमच्या मुलांपर्यंत पोहचू शकतात.



Comments are closed.