Skin Care Tips: उन्हाळ्यात वॉटर पार्कला जाण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी
उन्हाळा आला की थंडावा शोधणं ही सगळ्यांचीच गरज बनते. मग काही जण थंड पेयांकडे वळतात, तर काहीजण थेट वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारतात. पण जिथे मजा आहे, तिथे थोडी काळजीही गरजेची असते. कारण वॉटर पार्कमधील पाणी स्वच्छ दिसत असलं तरी त्यात केमिकल्सचं प्रमाण जास्त असू शकतं, जे तुमच्या त्वचेवर परिणाम करू शकतं. त्यामुळे एन्जॉयमेंटसोबत स्किन केअरही तितकीच महत्वाची आहे. (summer water park skin care tips swimming pool safety)
वॉटर पार्कला जाण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या
1. योग्य ठिकाणाची निवड करा
स्वच्छता आणि मेंटेनन्स चांगला असलेला वॉटर पार्क किंवा स्विमिंग पूल निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
2. सनस्क्रीन लावायला विसरू नका
पाण्यात जाण्यापूर्वी वॉटरप्रूफ सनस्क्रीन वापरा. यामुळे सूर्याच्या तीव्र किरणांपासून त्वचेचं संरक्षण होतं.
3. पेट्रोलियम जेलीचा वापर करा
शरीरावर हलक्या थराने पेट्रोलियम जेली लावल्यास त्वचेवर एक प्रोटेक्टिव्ह लेयर तयार होतो.
4. जखमा झाकून ठेवा
जर शरीरावर कुठे कट, स्क्रॅच किंवा जखम असेल, तर ती नीट झाकूनच पाण्यात उतरा. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
वॉटर पार्कमध्ये असताना लक्षात ठेवा:
1. योग्य कपड्यांचा वापर करा
स्विमिंग सूट घालणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा थेट केमिकलयुक्त पाण्याच्या संपर्कात कमी येते.
2. केसांसाठी कॅप वापरा
पूलमधील क्लोरीन केसांना नुकसान करू शकतं. त्यामुळे स्विमिंग कॅप वापरणं फायदेशीर ठरतं.
3. सनग्लासेस किंवा गॉगल्स वापरा
डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगल्स खूप उपयोगी ठरतात.
घरी आल्यानंतर काय कराल?
1. लगेच स्वच्छ आंघोळ करा
पूलमधील केमिकल्स आणि बॅक्टेरिया शरीरावर राहू नयेत म्हणून स्वच्छ पाण्याने आंघोळ करणं आवश्यक आहे.
2. त्वचेला मॉइश्चराइज करा
आंघोळीनंतर त्वचा कोरडी पडू शकते, त्यामुळे चांगलं मॉइश्चरायझर वापरा.
3. पुन्हा सनस्क्रीन वापरा
जर तुम्ही बाहेर जाणार असाल, तर पुन्हा सनस्क्रीन लावायला विसरू नका.
वॉटर पार्कमध्ये जाणं म्हणजे केवळ मजा नाही, तर थोडी जबाबदारीही आहे. योग्य काळजी घेतली, तर तुम्ही उन्हाळ्याचा आनंद मनसोक्त घेऊ शकता आणि त्वचेलाही कोणताही त्रास होणार नाही.
Comments are closed.