Bottle Hygiene Tips: स्टीलच्या बाटलीतलं पाणी ‘धातूसारखं’ लागतय? सावधान!
उन्हाळा असो, जिम असो किंवा ऑफिस आपण सगळेच स्टीलच्या बाटलीतून पाणी पिणं पसंत करतो. प्लास्टिकपासून दूर राहण्यासाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो.पण कधी तुम्हाला असं जाणवलंय का बाटलीतलं पाणी पिताना त्याला हलकी धातूसारखी (metallic) चव येते? बहुतेक वेळा आपण हे दुर्लक्षित करतो… पण ही छोटी गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी इशारा ठरू शकते. (why water tastes metallic in steel bottle causes and safety)
पाण्याला धातूची चव का येते?
जर पाण्याची चव बदलली असेल, तर त्यामागे पाण्यापेक्षा बाटली कारणीभूत असण्याची शक्यता जास्त आहे.
1) कमी दर्जाचे स्टील
सर्व स्टीलच्या बाटल्या सारख्या नसतात.निकृष्ट दर्जाच्या स्टीलमुळे पाण्याची चव बदलू शकते.
2) स्टीलच्या ग्रेडचा फरक
पिण्याच्या पाण्यासाठी 304 किंवा 316 ग्रेड स्टेनलेस स्टील सर्वोत्तम मानलं जातं. हे स्टील गंजरोधक असतं त्यामुळे पाण्याची चव बदलत नाही. स्वस्त बाटल्यांमध्ये कमी दर्जाचं स्टील वापरलं जातं, जे उष्णता किंवा ओलाव्यामुळे रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकतं आणि त्यामुळेच पाण्याला धातूसारखी चव येते.
3) स्वच्छतेचा अभाव
जर बाटली रोज स्वच्छ केली नाही, तर त्यात खनिजांचे थर (mineral deposits) साचतात. यामुळे पाण्याची चव बदलते आणि वासही येऊ शकतो.
बाटलीतली धातूची चव कशी टाळाल?
1) योग्य ग्रेड निवडा
नेहमी 304 किंवा 316 ग्रेड स्टीलची बाटलीच खरेदी करा.
2) आंबट पेये टाळा
लिंबूपाणी किंवा इतर acidic पेये स्टीलच्या बाटलीत जास्त वेळ ठेऊ नका. यामुळे रासायनिक प्रतिक्रिया होऊन चव बदलते.
3) दररोज स्वच्छता करा
बाटली रोज सौम्य साबणाने धुवा आणि पूर्ण कोरडी करूनच वापरा.
4) वेळेवर बाटली बदला
जर बाटलीत गंज, वास किंवा सतत खराब चव येत असेल तर ती लगेच बदलणं हाच योग्य पर्याय आहे.
स्टीलची बाटली चांगला पर्याय असली, तरी तिची गुणवत्ता आणि स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. पाण्याची चव बदलणे ही साधी गोष्ट नाही तो तुमच्या आरोग्याचा इशारा असू शकतो.
Comments are closed.