Zip Coding Trend: Gen-Z मध्ये वाढतोय ‘झिप-कोडिंग’ रिलेशनशिप ट्रेंड
बदलत्या लाईफस्टाइलप्रमाणे प्रेमाची व्याख्या देखील बदलताना दिसत आहे. एकेकाळी लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये भावना आणि संयमाला महत्त्व दिलं जायचं, पण आता नव्या पिढीने प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक प्रॅक्टिकल केला आहे. (genz zip coding relationship trend)
विशेषतः Gen-Z मध्ये ‘झिप-कोडिंग’ रिलेशनशिप हा ट्रेंड झपाट्याने वाढताना दिसतोय. “लव्ह नियर मी” या संकल्पनेवर आधारित हा ट्रेंड सांगतो की, नातं टिकवण्यासाठी अंतर कमी असणं तितकंच महत्त्वाचं आहे जितकं भावना असणं.
मुंबईसारख्या शहरांमध्ये तासन्तास प्रवास, ट्रॅफिक आणि व्यस्त जीवनशैली यामुळे तरुण वर्ग आता जवळ राहणाऱ्या व्यक्तींशीच नातं जोडण्याला प्राधान्य देत आहे. डेटिंग ॲप्सवरही ‘डिस्टन्स फिल्टर’ वापरून जवळच्या परिसरातील व्यक्तींशी कनेक्ट होण्याचा कल सध्या वाढला आहे.
‘झिप-कोडिंग’ म्हणजे काय आणि का वाढतोय हा ट्रेंड?
‘झिप-कोडिंग’ म्हणजे आपल्या पिन कोड किंवा राहत्या परिसरात असलेल्या व्यक्तीशी डेटिंग करणं. या ट्रेंडमागे अनेक व्यावहारिक कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेची बचत लांब अंतरावर भेटण्यासाठी लागणारा वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी तरुण जवळच्या नात्यांना पसंती देत आहेत. यामुळे नात्यातील भेटीगाठी सहज शक्य होतात आणि संवाद अधिक नियमित राहतो.
याशिवाय, सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. समान परिसर, ओळखीचे मित्र आणि समान जीवनशैली यामुळे विश्वास निर्माण होणं सोपं जातं. काही तज्ज्ञांच्या मते, हा ट्रेंड केवळ भौगोलिक सोयीपुरता मर्यादित नाही, तर काही प्रकरणांमध्ये नात्यांची व्याख्या बदलताना दिसते जिथे लोक फक्त एकाच शहरात किंवा परिसरात असताना रिलेशनशिपमध्ये असतात आणि अंतर वाढलं की ते स्वतःला सिंगल समजतात. त्यामुळे हा ट्रेंड नात्यांमधील बदलत्या अपेक्षा आणि मर्यादा दोन्ही दाखवतो.
Comments are closed.