वर्क फ्रॉम होमचा झोपेवार निकाल





गेल्या काही वर्षांपासून भारतातही अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम कल्चर सुरू केलं आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाचत असल्याने अनेकांसाठी हे सोयीस्कर झाले आहे. तर काहींवर मात्र त्याचे दुष्परिणाम होत आहेत. कारण रोजच्या ठरलेल्या दिनचर्येत बदल झाल्यामुळे शरीराची जैविक घड्याळ (बायोलॉजिकल सिस्टम) बिघडते. याचा सर्वाधिक परिणाम आपल्या झोपेवर होतो. तुम्ही रोजच्या तुलनेत रात्री लवकर झोपलात तरी सकाळी लवकर उठणे कठीण जाते. अनेकदा मध्यरात्री झोप मोडते आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसचे काम सुरू करता. पहाटे झोप लागते आणि सकाळी वेळेवर उठता येत नाही. त्यामुळे काही डेडलाईन्सही चुकतात. थोडक्यात, घरून काम करताना झोपेची संपूर्ण पद्धतच विस्कळीत होते. ही अनियमित झोप तुमच्या कामावरही परिणाम करते आणि हळूहळू तुम्ही अनिद्राच्या समस्येकडे झुकू शकता. म्हणूनच झोप नियमित आणि पुरेशी राहण्यासाठी खालील उपाय उपयुक्त ठरू शकतात:

दिवसात झोप घेणे टाळा
घरून काम करताना मध्येच झोप काढण्याची सवय टाळा. जर खूपच झोप येत असेल तर 15–20 मिनिटांची छोटी झोप (पॉवर नॅप) घ्या. यापेक्षा जास्त झोप घेऊ नका. दिवसात जास्त झोप घेतल्यास आळस वाढतो आणि रात्री नीट झोप लागत नाही.

स्वतःला बक्षीस द्या
जसे आपण इतरांना चांगल्या कामासाठी बक्षीस देतो, तसेच स्वतःलाही प्रोत्साहन द्या. वेळेवर उठल्यावर पौष्टिक नाश्ता करणे, आवडत्या पाळीव प्राण्यासोबत खेळणे किंवा एखादे चांगले पुस्तक वाचणे—अशा छोट्या गोष्टी स्वतःसाठी ठरवा. यामुळे चांगल्या सवयी टिकवणे सोपे जाते.

झोपेची वेळ ठरवा
झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा. सुरुवातीला हे कठीण वाटेल, पण सातत्य ठेवल्यास नक्कीच फायदा होतो. ठरलेल्या वेळेचे काटेकोर पालन केल्यास तुमची झोप सुधारेल आणि दिनचर्या शिस्तबद्ध होईल.

अ‍ॅप्स वापरा
काही मोबाईल अ‍ॅप्स वेळेवर झोपायला आणि उठायला मदत करतात. काही अ‍ॅप्स योग्य झोपेचा वेळ सुचवतात, तर काही व्यायाम आणि चालण्याची सवय लावतात. ते तुमच्या दैनंदिन हालचालींचे निरीक्षण करून मार्गदर्शनही करतात.

व्यायाम
घरात असलात तरी व्यायाम टाळू नका. हलका एरोबिक व्यायाम झोपेची सायकल सुधारण्यास मदत करतो. मात्र, झोपण्याच्या अगदी आधी व्यायाम करू नका आणि रात्री जड जेवण टाळा—हे आरोग्यासाठी अधिक चांगले आहे.



Comments are closed.