Cancer : कोणत्या वयात कॅन्सरचा सर्वात जास्त धोका?




कर्करोग प्रतिबंधक जीवनशैली


कॅन्सर हा शब्द ऐकला की अंगावर काटा उभा राहतो. सध्याची बदलती लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अन्य कारणांमुळे दिवसेंदिवस कॅन्सर पेशंटमध्ये वाढ होत आहे. त्यात सतत कानावर पडणाऱ्या कॅन्सर पेशंटच्या मृत्यूच्या बातमीने धस्स व्हायला होते. पण तज्ज्ञांच्या मते कॅन्सरची लक्षणे (Cancer Symptoms) योग्य वेळी ओळखली तर तो नक्कीच बरा होऊ शकतो. आज आपण वयानुसार कॅन्सर कसा वाढतो आणि कोणत्या वयोगटात जास्त धोका असतो, याबाबत तज्ज्ञांनी दिलेली माहिती जाणून घेऊयात.

कॅन्सर कोणत्याही वयोगटात होऊ शकतो, पण तो सर्वाधिक कोणत्या वयोगटात आढळतो याविषयी तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते सामान्यत: कॅन्सर 50 वर्षांनंतर अधिक प्रमाणात दिसून येतो. विशेष करून 60 ते 70 वर्षे वयोगटात त्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

का वाढतो धोका?

कर्करोग जागरूकता
कर्करोग प्रतिबंध

वय वाढल्यामुळे पेशींमधील जनुकीय बदल (Mutations) साचत जातात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. एखाद्या व्यक्तीचे वय वाढल्यावर इम्युनिटी कमी झाल्यामुळे कॅन्सर पेशींना वाढणे सोपे होते. ज्यामुळे कॅन्सर पेशी वाढत जातात. याशिवाय दीर्घकाळ तंबाखू, मद्यपान आणि चुकीच्या आहारामुळे कॅन्सरचा धोका म्हातारपणात वाढतो.

उपचार

कॅन्सरच्या प्राथमिक अवस्थेत शोध लागल्यास उपचाराने रुग्णाचा जीव वाचू शकतो. कॅन्सर एका जागी मर्यादित असेल तर त्यावर शस्त्रक्रियेने उपचार करता येतात. पण जर तो शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरला असेल तर केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा अनेक उपायांचा अवलंब करण्यात येतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॅन्सरसदृश लक्षणे दिसल्यास
ताबडतोब योग्य डॉक्टरांकडे उपचारासाठी न्यावे, जेणेकरून त्याचा जीव वाचू शकेल. तुम्ही जितका उशीर कराल तितका मृत्यूचा धोका वाढतो.

हेही वाचा – वर्क फ्रॉम होमचा झोपेवार निकाल



Comments are closed.