Natural Skincare Tips : नितळ, तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय
वाढत्या उष्णतेमुळे त्वचा काळवंडणे, मुरुमे येणे आदी समस्या जास्त प्रमाणात जाणवतात. यापासून मुक्ती मिळण्यासाठी अनेकजण बाहेरील स्किनकेअर प्रॉडक्टचा वापर करतात. परंतू दरवेळी त्याचे परिणाम दिसून येतीलच असे नाही. अशावेळी तुम्ही त्वचेची नैसर्गिकरित्या केअर करून त्वचा कशी टवटवीत आणि तजेलदार ठेवू शकता हे पाहायला हवे. आजच्या लेखात आपण तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय करून त्वचेची देखभाल कशी राखावी यासंदर्भात काही टिप्स पाहूयात.
चेहरा स्वच्छ ठेवा (Cleansing)
सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी नैसर्गिक क्लिन्झरने चेहरा धुवावा.
टोनरचा वापर (Toning)
गुलाब पाणी, काकडीचा रस किंवा एलोवेरा जेल यांचा टोनर म्हणून वापर करता येईल. हे टोनर त्वचेचा pH संतुलित ठेवेल.
नैसर्गिक मॉइस्चरायझिंग
जर तुमची त्वचा कोरडी असेल तर मॉइश्चरायझरसाठी मध किंवा बदाम तेल हे पर्याय उत्तम आहेत आणि तेलकट त्वचेसाठी कोरफड जेल वापरावे.
हेही वाचा – नखांची काळजी: नेलपॉलिश किती दिवस ठेवावी?
सनस्क्रीन
सध्या उन्हाळा तीव्र प्रमाणात जाणवत आहेत. अक्षरश: उन्हाचे चटके त्वचेला जाणवत आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना SPF 30+ असलेले सनस्क्रीन लावून बाहेर निघावे.
एक्सफोलिएशन
आठवड्यातून 1 ते 2 वेळा साखर, मध किंवा ओट्स वापरून स्क्रब करण्यास विसरू नये.
फेस पॅक (Face Pack)
हळद आणि बेसन किंवा दह्याचा फेस पॅक त्वचेला उजळ बनवण्यासाठी वापरू शकता.
योग्य आहार (Diet)
त्वचा निरोगी हवी असल्यास त्वचेला आतून आणि बाहेरून दोन्हीकडून पोषण मिळणे आवश्यक असते. त्यामुळे आहारात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असलेल्या फळांचा समावेश तुम्ही करायला हवा.
भरपूर पाणी प्या (Water)
शरीराला हायड्रेट ठेवल्याने त्वचा चमकते.
हेही वाचा – वर्कींग वुमनसाठी “रेडी टू वेअर साडी”
Comments are closed.