Itchy skin: घामामुळे सतत खाज येते? करू शकता हे घरगुती उपाय

यंदा कमालीचा उन्हाळा जाणवत आहे. मुंबईसह सर्वत्र तापमानात वाढ होत असल्याने सगळेच उकाड्याने हैराण झाले आहे. तीव्र उष्णतेमुळे घाम, चिकटपणाने अगदी नकोसे झाले आहे. त्यात या दिवसात घामामुळे होणाऱ्या आजारांचा धोका असतो. उन्हाळ्यात शरीराला घामामुळे खाज सुटते. सतत खाजवून खाजवून ती जागा लाल होते आणि चट्टे देखील उठतात. त्यामुळे आज आपण खाज थांबवण्यासाठी घरच्या घरी काय उपाय करता येईल हे जाणून घेणार आहोत.

खोबरेल तेल

त्वचेच्या कोरडेपणामुळे शरीराला खाज येण्याची जास्त शक्यता असते. यावर उपाय म्हणून तुम्ही खोबरेल तेल शरीराला लावू शकता.

कोमट पाण्याची आंघोळ

घामामुळे येणाऱ्या खाजेने हैराण झाले असाल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी आणि त्यानंतर संपूर्ण शरीराला खोबरल तेल लावावे.

हेही वाचा – Natural Skincare Tips : नितळ, तजेलदार त्वचेसाठी नैसर्गिक उपाय

पेट्रोलियम जेली

शरीराची खाज कमी होण्यास पेट्रोलियम जेली मदत करते. तसेच त्वचा जर संवदेनशील असेल तर पेट्रोलियम जेली फारच उपयुक्त असते.

कोरफड

शरीरावरील खाज येत असलेल्या भागावर कोरफडातील गर लावावा. काही मिनिटे तसेच राहू द्यावे आणि नंतर साध्या पाण्याने भाग स्वच्छ करावा किंवा गर तसाच सुकू दिला तरी चालेल, या उपायामुळे तुम्हाला आराम नक्की मिळेल.

बर्फाचा शेक

सुती कपड्यात बर्फ गुंडाळून खाज येत असलेल्या भागावर लावल्यासत्वचेची आग कमी होण्यास मदत होते.

खाज टाळण्यासाठी काय कराल?

  • उन्हाळ्यात घट्ट आणि सिथेटिक कपडे टाळून सैल आणि सुती (Cotton) कपडे वापरावेत, ज्यामुळे त्वचेला हवा खेळती राहील.
  • शरीराला जास्त घाम येत असल्यास दिवसातून दोनदा आंघोळ करावी.
  • बाहेरून घरी आल्यावर हात पाय स्वच्छ धुवावेत.
  • आंघोळीनंतर घामोळ्याच्या पावडरचा वापर करा, ज्यामुळे त्वचा कोरडी राहील.

डॉक्टरांना केव्हा दाखवावे?

जर खाज खूप जास्त असेल, पुरळ खूप लाल झाले असतील, त्यात पू झाला असेल किंवा घामोळे जास्त दिवस टिकून राहत असतील, तर त्वचारोगतज्ज्ञांचा (Dermatologist) सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा – Ice Apple: उन्हाळ्यात ताडगोळे खाण्याचे फायदे; शरीर राहील थंड आणि ताजेतवाने

Comments are closed.