Shoe Rack : चपलांचा पसारा होईल छू-मंतर; असा निवडा परफेक्ट शू रॅक
वेगवेगळ्या कपड्यांच्या प्रकारांवर मॅच होतील असे विविध प्रकाराच्या चपला आणि बुट आपल्याकडे असतात. अनेकदा इतक्या चपला बुटांच्या जोड आपल्याकडे जमा होतात की दारात त्यांचा ढीग साचतो. असा चपलांचा ढीग घर कितीही सजवलेले असेल, स्वच्छ असेल तर त्याची शोभा घालवू शकतो. अशा वेळी केवळ चपला ठेवण्यासाठीच नाही तर घराच्या सुव्यवस्थितपणासाठी योग्य ‘शू रॅक’ ची (Shoe Rack) निवड करणे आवश्यक असते. आज आपण योग्य जागेची बचत करणारा आणि टिकाऊ शू रॅक कसा निवडावा, याच्या काही सोप्या टिप्स पाहूयात.
टिप्स –
कोणताही शू रॅक खरेदी करताना तो तुम्ही कुठे ठेवणार आहात, तेथील जागा कशी आहे? त्यानुसार उंची, लांबी आणि रुंदी मोजावी आणि खरेदी करावा.
शू रॅक शक्यतो मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा प्रवेशद्वारावर असावा. यामुळे बाहेरची धूळ आणि घाण घरात येणार नाही.
जर तुमच्या प्रवेशद्वारावर जागा कमी असेल तर Vartical किंवा भिंती बसवले जाणारा शू रक निवडावा.
शू रॅक कपाटासारखे पूर्ण बंद होईल असे वापरू नये. यामुळे हवा खेळती राहत नाही आणि दुर्गंधी सर्वत्र पसरते.
रॅक ठेवल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा उघडायला किंवा बंद करायला अडथळा येत नाही ना याची खात्री करावी.
शू रॅकमध्ये दररोज लागणाऱ्या चपला हाताशी येतील अशा वरच्या कप्प्यात किंवा मध्ये ठेवू शकता. सणासुदीच्या , पावसाळी चपला वेगवेगळ्या कप्प्यात ठेवाव्यात.
जागा वाचवण्यासाठी एक बूट सरळ आणि दुसरा उलट असे ठेवावे.
बाहेरून आल्यावर चपला बूट तसेच रॅकमध्ये न ठेवता ओल्या कापडाने किंवा ब्रशने पुसून ठेवावेत. यामुळे रॅक खराब होत नाही.
रॅकमध्ये सिलिका जेलची पाकिटे (Silica Gel Packets), वाळलेला कडुलिंब किंवा बेकिंग सोडा ठेवल्यास ओलावा आणि दुर्गंधी कमी होते.
शू रॅक साहित्य
लाकूड – हे शू रॅक दिसायला प्रिमियम दिसतात आणि मजबूतही असतात. पण ओल्या चपला यात ठेवल्यावर हे शू रॅक खराब होऊ शकतो.
धातू/पोलाद – या दोन्ही मटेरियलचे रॅक टिकाऊ असतात.
प्लास्टिक – प्लास्टिकचे शू रॅक वजनाला हलके असतात. पण ते जास्त काळ टिकत नाही.
अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट ट्रिक्स वापरून शू रॅक खरेदी करून टिकवू शकता.
हेही वाचा – Office Desk Setup : ऑफिस डेस्क कसा असावा?
Comments are closed.