Missing Link Project Photo : मुंबई-पुण्यातील अंतर कमी करणारा मिसिंग लिंक पाहिलात का?
मुंबई : मुंबई-पुणे महामार्गानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे बांधण्यात आला. मात्र तरीही हे दोन्ही महामार्ग वाहतुकीसाठी अपुरे पडू लागले. त्यातही घाटात अनेकदा वाहतूक कोंडी होते आणि प्रवाशांचा अनेक तास खोळंबा होतो. त्यावर उपाय म्हणून मिसिंग लिंकचे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवासात अर्धा तास वाचणार आहे. शिवाय घाटातील वाहतूक कोंडी फुटणार असल्याने प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नलमुक्त होणार आहे. त्यामुळे 1 मे रोजी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर त्यावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर आधी फोटो पाहून घ्या…
Comments are closed.