Work From Home: वर्क फ्रॉम होम करताना लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या टिप्स
घरून काम करणं हे (Work From Home) ऐकायला जितकं सोपं वाटतं, तितकं प्रत्यक्षात नसतं. सुरुवातीला आरामदायी वाटणारी ही पद्धत हळूहळू आळस, कामाचा ताण आणि लक्ष विचलित होण्याचं कारण बनते. कधी बेडवरून काम, कधी मध्येच सोशल मीडिया, तर कधी अजून काही यामुळे वेळेचं काहीच भान राहत नाही अशी परिस्थिती अनेकांची होते. (work from home tips for productivity and health)
पण काही साध्या सवयी आपण लावल्या, तर तुम्ही घरून काम करतानाही ऑफिससारखीच प्रोडक्टिव्हिटी आणि बॅलन्स राखू शकता. चला तर मग, जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.
1) वेळचे योग्य नियोजन (Time Management)
वर्क फ्रॉम होममध्ये सर्वात मोठं चॅलेंज म्हणजे वेळेचं नियोजन. ऑफिससारखंच लॉगिन आणि लॉगआऊटची ठरलेली वेळ ठेवा, त्यामुळे काम आणि वैयक्तिक वेळ यामध्ये संतुलन राहील.
दिवसाची सुरुवात कामांच्या यादीने करा आणि प्राधान्यक्रमानुसार कामे पूर्ण करा. तसेच, सतत स्क्रीनकडे न बघता दर तासाला छोटा ब्रेक घ्या. यामुळे थकवा कमी होतो आणि फोकस वाढतो.
2) योग्य वर्कस्टेशनची निवड
बेडवर बसून काम करणे जितकं आरामदायी वाटतं, तितकंच ते हानिकारक ठरू शकतं. यामुळे आळस येतो आणि पाठीचे दुखणे वाढते. म्हणूनच टेबल-खुर्चीवर बसून, पाठीचा कणा ताठ ठेवून काम करा. घरात एक ठराविक आणि शांत जागा निवडा, जिथे काम करताना व्यत्यय येणार नाही. यामुळे कामात एकाग्रता टिकून राहते.
3) शारीरिक आणि मानसिक आरोग्य
घरून काम करताना आपण तासन्तास एकाच जागी बसून राहतो, ज्याचा शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे अधूनमधून उठून थोडं चालणं किंवा स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे.
4) लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळा
वर्क फ्रॉम होममध्ये सर्वात मोठा शत्रू म्हणजे सोशल मीडिया! काम करताना मोबाईलपासून शक्य तितकं दूर राहा. तसेच, घरातील सदस्यांना तुमच्या कामाच्या वेळा सांगून ठेवा, जेणेकरून कामाच्या वेळी व्यत्यय येणार नाही. यामुळे तुमचा फोकस आणि कामाचा वेग दोन्ही वाढतील.
5) आहार आणि दिनचर्या
घरात असल्यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची सवय लागते. त्यामुळे जंक फूड टाळून घरचा सकस आहार घ्या. पाणी पिणं विसरू नका जवळ नेहमी पाण्याची बाटली ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, रोज अंघोळ करून व्यवस्थित कपडे घालून कामाला बसा. यामुळे कामाचा मूड तयार होतो आणि आळस दूर राहतो.
वर्क फ्रॉम होम यशस्वी बनवायचं असेल, तर शिस्त आणि सवयी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. थोडं planning, थोडं discipline आणि थोडी स्वतःची काळजी यामुळे तुम्ही घरून काम करतानाही तितकेच आरामदायी राहू शकता.
Comments are closed.