कार्य संस्कृती: पहिल्या 30 दिवसात कंपनीची कार्यसंस्कृती ओळखा
गेल्या काही वर्षांपासून आयटीसह विविध क्षेत्रातील कंपन्यांतील वातावरण म्हणजेच वर्क कल्चर सतत चर्चेत आहे. खासगी कंपन्यां, संस्थांमध्ये कशाप्रकारे कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जाते, महिलांचाच नाही तर पुरुषांचाही शारीरिक- मानसिक छळ केला जातो याच्या अनेक घटनाही सातत्याने समोर येत आहे. यामुळे अशा वातावरणात कर्मचारी नोकरीच का करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आजच्या महागाईच्या काळात नोकरी सोडणे हे प्रत्येकाला सहज शक्य होत नाही. कारण घरासाठी घेतलेल कर्ज, मुलांचे शिक्षण, मोठ्यांचे आजारपण यासाठी जो पैसा लागतो तो सगळा याच नोकरीमधून मिळत असतो. यामुळे दुसरी नोकरी मिळेपर्यंत नोकरी सोडण्याचे धाडस कर्मचारी करत नाही. पण जर तुम्ही नवीन जॉब मिळाल्यावर पहील्या महिन्याभरातच कंपनीच्या कामकाजाच्या पद्धतीसह इतर गोष्टींचे निरिक्षण केले तर कदाचित अशी वेळ तुमच्यावर कधीही येणार नाही. त्यासाठी काय करावे ते बघूया.
नवीन जॉब लागल्यावर पहिल्या महिन्यात काय करावं?
1. तपासणी करा
नवीन नोकरी लागताच आपण नव्या ठिकाणी कोणाला ओळखत नसतो. अशावेळी पहीला एक महिन्यात तेथील माणसांचे निरिक्षण करावे.
ते तुमच्याशी कसे बोलतात? तुम्हाला प्रोत्साहन देतात की टिका करतात? तुमच्याविरोधात त्यांचा गट सक्रीय झालाय का?
तुमच्याविरोधात ते वरिष्ठांना इतर सहकऱ्यांना भडकवत आहेत का? हे सगळे ओळखायला तुम्हाला ३० दिवसांचा कालावधी पुरेसा असतो.
ऑफिसमध्ये मिटींग्ज कशा घेतल्या जातात?
शिस्तीत काम केले जाते की टाईमपास, गॉसिपिंगमद्येच सगळे व्यस्त असतात ते पाहावे
ज्यावेळी तुम्ही नवीन ठिकाणी कामाला जाता तेव्हा सुरुवातीला जास्त बोलण्यापेक्षा निरिक्षण करणं जास्त महत्त्वाचे आहे हे ओळखा.
2. कनेक्ट व्हा
ज्यावेळी आपण कंपनीत नवीन असतो तेव्हा तुमचा थेट संबंध हा टीममेट्स आणि मॅनेजरसोबत येतो. त्यामुळे त्यांना टाळणे शक्य नसते अशावेळी टीमसोबत
कनेक्ट व्हावे. त्यांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात. त्यामुळे तुम्हाला कामाची दिशा मिळते.
तसेच “इथे काम कसं चालतं?”असे साधे प्रश्न टिममेट्सला विचारावे. वर्क कल्चर समजून घेण्यासाठी तुम्हाला टिममेट्सबरोबर जुजबी रिलेशन ठेवावेच लागते.
तरच तेथील कामाचे स्वरूप समजणे सोपे जाते.
3. कंपनीचे नियम आणि अटी आणि शर्थी समजून घ्या
कंपनीत एचआर डिपार्टमेंट हे महत्वाचे डिपार्टमेंट असते. त्यामुळे सुट्टी, ड्युटी, कामाचे तास, परर्फॉर्मन्स, ऑफिशियल ईमेल याबदद्ल संपूर्ण माहीती घ्या.
4. कामाची पद्धत समजून घ्या
टास्क बदद्ल विचारा, अप्रुव्हल कसे घेतले जातात ते विचारा
डॉक्यूमेंटेशन किती महत्त्वाचं आहे याची माहीती घ्या.
5. फिडबॅक घ्या आणि द्या
मॅनेजर कडून फिडबॅक मागा.
“मी योग्य दिशेने काम करतोय का?” असा प्रश्न विचारा
————————————
6. इतर कर्मचारी ओव्हरटाईम करतात का ? त्याचे वेगळे पैसे कंपनी देते का? ते विचारा करा
सुट्टीच्या दिवशीही काम अपेक्षित असतं का? ते विचारा
यावरून कंपनी कल्चर बद्दल खूप काही कळतं.
दिलेली काम वेळेत पूर्ण करा त्यामुळे तुमच्यातील कौशल्य वरिष्ठ ओळखतील.
7. रेड फ्लॅग्ज ओळखा
कंपनीच्या कामाच्या पद्धतीबद्दल तुम्हाला योग्य माहीती देत नसतील तर हा रेड फ्लॅग्ज आहे.
वाटेल तेव्हा वाटेल ते काम सांगत असतील तर तो रेड फ्लॅग्ज आहे.
तुमच्या कामाची नोंद न घेता इतरांनी दिलेल्या फिडबॅकवर तुम्हाला प्रश्न केले जात असतील तर हा रेड फ्लॅग्ज आणि अनप्रोफेशनल अप्रोच आहे हे ओळखा.
आणि दुसरीकडे नोकरी शोधण्यास सुरुवात करा.
Comments are closed.