Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळेही अडकल्या




Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, सुप्रिया सुळेही अडकल्या


सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक तात्पुरती थांबवून पुण्याकडील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली आहे. कोंडीदरम्यान काही वाहने बंद पडल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल चार तास उलटूनही प्रवासी वाहतूक कोंडीत अडकल्याने मनःस्ताप व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसल्याचे पाहायला मिळाले. त्या सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकल्याने सरकारने ही वाहतूक कोंडी लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी त्यांनी केली.



Comments are closed.