Reheating Food: ऑफिसमध्ये जेवण गरम करताना मायक्रोवेव्ह ओव्हन वापरता? मग थांबा…

हल्लीच्या धावपळीच्या ऑफिस लाईफमध्ये डबा मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खाणं ही सवय जवळपास सर्वांचीच झाली आहे. सोयीस्कर आणि पटकन होणारा हा पर्याय जरी वेळ वाचवणारा असला, तरी त्याचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याचा विचार क्वचितच केला जातो. योग्य पद्धतीने वापर न केल्यास हीच सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

मायक्रोवेव्हमध्ये जेवण गरम करण्याचे परिणाम:

1. पोषकद्रव्यांवर परिणाम
अन्न वारंवार गरम केल्याने त्यातील जीवनसत्त्वे (Vitamins) आणि आवश्यक पोषक घटक कमी होऊ शकतात. विशेषतः भाज्या आणि प्रथिनयुक्त पदार्थांमध्ये हा परिणाम जास्त दिसतो.

2. योग्य तापमान महत्त्वाचे
अन्न सुरक्षित राहण्यासाठी ते किमान 63°C ते 82°C तापमानापर्यंत गरम होणं गरजेचं आहे. यामुळे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.

3. प्लास्टिकचा धोका टाळा
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये प्लास्टिकच्या डब्यात जेवण गरम केल्यास त्यातील केमिकल्स अन्नात मिसळू शकतात. त्यामुळे काचेची (Glass) किंवा सिरॅमिकची भांडी वापरणे अधिक सुरक्षित ठरते.

4. फूड पॉयजनिंगचा धोका
भात, अंडी, चिकन, मशरूम किंवा बटाट्याचे पदार्थ पुन्हा-पुन्हा गरम केल्यास बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे फूड पॉयजनिंग होण्याचा धोका वाढतो.

ऑफिसमध्ये सुरक्षितपणे जेवण गरम करण्यासाठी टिप्स:
– जेवण शक्यतो फक्त एकदाच गरम करा.
– अन्न सर्व बाजूंनी व्यवस्थित गरम झाले आहे याची खात्री करा.
– मायक्रोवेव्ह-सेफ काचेची किंवा सिरॅमिक भांडी वापरा.
– खूप वेळ बाहेर ठेवलेलं अन्न पुन्हा गरम करून खाणे टाळा.
– गरम केल्यानंतर अन्न लगेच खा, उशीर करू नका.

मायक्रोवेव्हचा वापर पूर्णपणे टाळण्याची गरज नाही, पण योग्य पद्धत आणि काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

Comments are closed.