Angarki Chaturthi : अंगारकीचा चंद्रोदय कधी? जाणून घ्या तूमच्या शहरातील अचूक वेळ




अंगारकी चतुर्थीची माहिती


हिंदू धर्मात श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दर महिन्याला येणारी ही चतुर्थी विशेषतः फलदायी असते, परंतु जेव्हा ती मंगळवारी येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीला पूजा करण्याची पद्धत, महत्त्व आणि चंद्रोद्याची वेळ जाणून घेऊयात

शुभ वेळ

पंचागानुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी सुरूवात मंगळवार 5 मे रोजी सकाळी 5.24 वाजता होईव आणि बुधवार, 6 मे रोजी सकाळी 7.51 वाजता ही तिथी संपणार आहे. त्यामुळे उदयतिथीनुसार अंगारकी चतुर्थी 5 मे रोजी असणार आहे.

चंद्रोदयाची वेळ

अंगारकी चतुर्थीचा उपवास 5 मे रोजी केला जाईल आणि चंद्रोदयाची वेळ रात्री 10.31 वाजता आहे.

पूजा करण्याची पद्धत

  • संकष्टी चतुर्थीला ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करावेत.
  • स्नान झाल्यावर हातात पाणी घेऊन उपवास करण्याचा संकल्प करावा.
  • यानंतर पाटावर लाल वस्त्र टाकून श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी.
  • श्री गणेशाला अभिषेकाने करावा.

हेही वाचा – देवपूजेत दिव्याचे महत्व आणि प्रकार

  • अभिषेक झाल्यावर अक्षता, फुले,दूर्वा अर्पण करा,
  • शेंदूराचा टिळा लावावा.
  • पूजा झाल्यावर गणेशाची आरती म्हणा आणि नामस्मरण देखील करावे.
  • नंतर श्री गणेशाला मोदक किंवा लाडवाचा नैवेद्य दाखवा.
  • संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी.
  • रात्री चंद्राचे दर्शन करून उपवास सोडावा.

चंद्रोदयाची वेळ

मुंबईत साधारणपणे –

रात्री 10 वाजून 21 मिनिटे

पुण्यात साधरणपणे –

रात्री 10 वाजून 16 मिनिटे

हेही वाचा – वट सावित्री अमावस्या आणि पौर्णिमा: नेमका फरक काय?



Comments are closed.