Fasting Tips : उन्हाळ्यात उपवास करताना आरोग्याची घ्यावी ही खबरदारी

श्री गणेशाचे भक्त आवर्जून संकष्टी, अंगारकीचा उपवास करतात. उद्या 5 मे 2026 रोजी अंगारकी चतुर्थी आहे. त्यामुळे अनेक गणेशभक्त अंगारकीचा उपवास करतील. परंतू उन्हाळ्यात उपवास करणे हे आरोग्याच्यदृष्टीने थोडे आव्हानात्मक ठरू शकते. सध्याचे तापमान पाहता या दिवसात उपवास करताना थोडी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आज आपण उन्हाळ्यात उपवास करताना स्वत:ला हायड्रेट कसे ठेवायचे यासंदर्भातील काही सोप्या टिप्स पाहूयात.

पेय

उन्हाळ्यात उपवास करताना केवळ पाणी पिणे योग्य नाही. पाण्यासोबत काही नैसर्गिक पेय तुम्ही घ्यायला हवीत. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राहतात.

शहाळे पाणी उपवासासाठी हे सर्वात उत्तम पेय आहे. यात पोटॅशियम आणि नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे थकवा जाणवत नाही.

कोकम हे पित्तनाशक आहे. उपवास करताना याचे सेवन करावे. साखर आणि सैंधव मीठ घातलेले कोकम सरबत शरीरातील उष्णता कमी करते.

उपवासाला सैंधव मीठ आणि जिरे पूड घातलेले ताक पिऊ शकता. यामुळे शरीर थंड राहील.

हेही वाचा – Morning Routine Tips: सकाळच्या आरोग्यदायी सवयी

फळे

कलिंगड आणि टरबूज खा. यात 90 % पेक्षा जास्त पाणी असते.

द्राक्षे आणि संत्री खावीत. ही फळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात आणि उपवास करताना तुम्ही हायड्रेट राहतात.

उपवासाच्या कोशिंबिरीत काकडीचा वापर करा, ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.

महत्त्वाच्या टिप्स

साबुदाणा वडा किंवा बटाटा वेफर्स यांसारखे तेलकट पदार्थ खाल्ल्याने जास्त तहान लागते आणि शरीरात उष्णता वाढते. त्याऐवजी साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात खावा.

वरीचा भात आणि दही खाव. यामुळे पोट शांत राहते आणि दीर्घकाळ भूक लागत नाही.

चहा किंवा कॉफीमुळे शरीर जास्त डिहायड्रेट होते. त्यामुळे उपवासादरम्यान दिवसातून एक किंवा दोनदाच याचे सेवन करावे.

हेही वाचा – Heatwave Safety: तीव्र तापमानात आरोग्य कसं जपावं?

Comments are closed.