West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये बदलाचे वारे; भाजपा कार्यकर्त्यांकडून ‘झालमुरी’ भेळ खात जल्लोष
नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये तब्बल 15 वर्षांनंतर भाजप पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. भाजप पश्चिम बंगालमध्ये 190 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जल्लोष करताना दिसत आहे. विशेष म्हणजे निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी झारग्राम विधानसभा मतदारसंघातील एका छोट्याशा दुकानातून ‘झालमुरी’ भेळ विकत घेतली होती. त्यानंतर चर्चेत आलेली झालमुरी भेळ खात भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.
Comments are closed.