रंगांच्या नावाने प्रसिद्ध असणारी भारतातील शहरे
भारत पर्यटनासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथील काही शहरे जेवणासाठी, काही ऐतिहासिक वारसासाठी प्रसिद्ध आहेत. पण आज आम्ही तुम्हाला देशातील अशा काही शहरांविषयी सांगणार आहोत, जी खास रंगांमुळे जगभर प्रसिद्ध झाली आहेत. एखादे शहर गुलाबी रंगासाठी ओळखले जाते, तर दुसरे निळ्या छटांनी सजलेले दिसते. या रंगांमागे इतिहास, परंपरा आणि स्थानिक जीवनशैलीची अनोखी कहाणी दडलेली आहे. आजच्या लेखात देशातील रंगाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शहरांविषयी जाणून घेऊयात.
गुलाबी शहर
राजस्थानमधील जयपूर या शहरातील ऐतिहासिक इमारती या गुलाबी रंगाने रंगवल्या आहेत. ज्यामुळे या शहराला पिंक सिटी असे म्हटले जाते. जयपूर हे केवळ भारतातचं नव्हे जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
निळे शहर (Blue City)
राजस्थानमधील जोधपूर येथील मेहरानगड किल्ल्याजवळील घरे आणि रस्ते निळ्या रंगात रंगवलेले आहेत. निळा रंग हा सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. येथे तुम्ही मेहरानगड किल्ला, उम्मेद भवन पॅलेज, जसवंत थडा आणि निळ्या रंगाची वस्ती पाहू शकता.
हेही वाचा – Water Of Tears Lake : भारतातील या तलावाला का म्हटले जाते अश्रूंचे तलाव?
पांढरे शहर (White City)
राजस्थानमधील उदयपूर हे शहर तलावांचे शहर आणि येथील पांढऱ्या संगमरवरी राजवाड्यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्ही लेक पिचोला, सिटी पॅलेस, सज्जनगड किल्ला, जग मंदिर पाहू शकता.
सोनेरी शहर (Golden City)
राजस्थानमधील जैसलमेर हे शहर पिवळ्या वाळूच्या दगडांपासून बनवलेल्या इमारतींमुळे सूर्यप्रकाशात सोन्यासारखे चमकते. जैसलमेरचे सुवर्णनगरी हे नाव समृद्ध ऐतिहासिक वारशाचे प्रतिबिंब आहे, जे जगभरात प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही सोनार किल्ला, पटवोन की हवेली, सॅम सँड ड्युन्ससारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
कुन्नूर (ग्रीन सिटी)
तमिनाडूमधील कुन्नूर शहर त्याच्या हिरवळीसाठी ओळखले जाते. हे तमिळनाडूतील सुंदर शहरांपैकी एक आहे.
चेन्नई (यलो सिटी)
चेन्नईतील अनेक ऐतिहासिक इमारती पिवळ्या रंगाच्या आहेत, विशेषतः ब्रिटिश राजवटीत बांधलेल्या इमारती.
हेही वाचा – Travel: Aesthetic Vibes साठी मुंबईतील ‘हे’ फोटोस्पॉट तरुणाईमध्ये हिट
Comments are closed.