Food Calories : कोणत्या पदार्थात किती कॅलरीज असतात?

सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा नाश्ता .. भारतीयांना दररोज काहीतरी चटपटीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा असते. भारतीयांच्या नाश्त्यात सकाळी मिसळ पाव, पोहे, इडली, उपमा, कचोरी, समोसे असे पदार्थ असतात. या पदार्थांतून आपल्या शरीराला कॅलरीज मिळतात, त्याचा आपल्या वजनावर व आरोग्यावर परिणाम होतो. आज आपण भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात यावर एक नजर टाकूया,

किती कॅलरीज आवश्यक?

आहारतज्ज्ञांच्या मते, एका सुदृढ व्यक्तीला सकाळी अंदाजे 300 ते 400 कॅलरीजच्या नाश्त्याची गरज असते. मात्र, आपल्या काही आवडत्या पदार्थांमुळे हा आकडा सहज ओलांडला जातो.

मिसळपाव –

मिसळ पाव

मिसळपावच्या एका प्लेटमध्ये 450 ते 500 पेक्षा जास्त कॅलरीज असतात.

साबुदाणा खिचडी –

साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडीच्या प्लेटमध्ये 300 ते 350 कॅलरीज असतात.

पोहे –

हेही वाचा – Oil Free Puri in Cooker: ‘या’ ट्रिकने कुकरमध्ये बनवा ऑईल-फ्री पुऱ्या

पोहे

एका मध्यम प्लेट कांदे पोह्यांमध्ये 200 ते 220 कॅलरीज असतात.

इडली सांबार –

इडली सांबार

अनेक घरात सकाळी नाश्त्यात इडली सांबारचा नाश्ता केला जातो. हा नाश्ता हलका जरी वाटत असला तरी अवघ्या दोन इडल्यांमधून तुम्हाला 150 ते 180 कॅलरीज मिळतात.

समोसा –

समोसा

बटाट्याच्या समोस्यामध्ये 250 ते 300 कॅलरीज असतात. यातील कॅलरीज आतील सारणावर अवलंबून असते.

भजी –

भजी

तुम्ही सकाळी नाश्त्यात 4 ते 5 कांदा भजी खाल्ल्यास शरीरात 200 ते 300 कॅलरीज जातात.

ढोकळा –

ढोकळा

गोड, आंबट आणि तिखट चवीचा खायला अतिशय हलका असतो. तुम्ही जर दोन किंवा तीन ढोकळे खाल्ले तर त्यातून केवळ 150 ते 180 कॅलरीज मिळतात.

चहा –

चहा

जर तुम्ही सकाळी एक कप चहा घेत असाल तर त्यातून 60 ते 75 कॅलरीज मिळतात.

कॉफी –

कॉफी

एक कप कॉफीमधून 80 ते 100 कॅलरीज मिळतात.

हेही वाचा – Paper Cup Side Effects : पेपर कपमध्ये चहा पिताय? सावधान!

Comments are closed.