Bandra Demolition : वांद्र्यातील गरीब नगर कारवाईचा चौथा दिवस, हे विदारक फोटो पाहिले का?





मुंबई : मुंबईतील वांद्रे (पूर्व) रेल्वे स्थानकालगत असलेल्या गरीब नगर भागात पश्चिम रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अत्यंत मोठी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. या कारवाईला शुक्रवारी (22 मे) चार दिवस झाले. या कारवाईअंतर्गत रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेली सुमारे 400 अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात येणार असून शुक्रवारपर्यत ही कारवाई जवळजवळ पूर्ण झाली असून आता थोडेच काम शिल्लक असून शनिवारी (23 मे) पाडकाम पूर्ण होईल, असे सांगण्यात आले आहे. बुधवारी (20 मे) दुसऱ्या दिवशी या कारवाईला हिंसक वळण लागले होते. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई अद्याप सुरु आहे. (फोटो सौजन्य – दीपक साळवी)



Comments are closed.