Onion : कापलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवणं योग्य की अयोग्य?
भाजी बनवण्यासाठी गृहिणी कांदा वापरतात आणि उरलेला अर्धा कांदा नंतर वापरण्यासाठी थेट फ्रिजमध्ये ठेवून देतात. जर तुम्हीही असं करत असाल, तर वेळीच सावध व्हा! उरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवणे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. आज आपण चिरलेला किंवा उरलेला कांदा फ्रिजमध्ये ठेवून पुन्हा वापरल्यास त्याचे काय परिणाम होतात हे जाणून घेऊयात.
परिणाम –
नैसर्गिकरित्या कांद्यात हवेतील बॅक्टेरिया शोषून घेण्याचे गुणधर्म असतात. जेव्हा तुम्ही कांदा कापून उघडा किंवा फ्रिजमध्ये ठेवता, तेव्हा तो फ्रिजमधील इतर अन्नपदार्थांचे बॅक्टेरिया आणि वातावरणातील विषारी वायू स्वतःकडे वेगाने आकर्षित करतो. असा कांदा पुन्हा खाल्ल्याने पोटात इन्फेक्शन, डायरिया किंवा फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो.
हेही वाचा – Heat And Food : गरमीमुळे अन्न खराब होतंय? किचनमध्ये करा हे छोटे बदल
कांदा कापून जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्याला पाणी सुटू लागते आणि तो मऊ पडतो. फ्रिजमधील थंड हवेमुळे कांद्यामध्ये असलेले आवश्यक पोषक घटक, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स पूर्णपणे नष्ट होतात. असा कांदा खाण्याने शरीराला कोणताही फायदा होत नाही.
कांद्याचा वास अत्यंत उग्र असतो. कापलेला कांदा फ्रिजमध्ये उघडा ठेवल्याने त्याचा वास फ्रिजमधील दूध, पाणी, पालेभाज्या किंवा शिजवलेल्या अन्नाला येतो. यामुळे फ्रिजमधील इतर पदार्थही खाण्यायोग्य राहत नाहीत.
उरलेल्या कांद्याचं काय करावं?
स्वयंपाक करताना आवश्यक तेवढाच कांदा कापा. अर्धा कांदा उरलाच, तर तो टाकून न देता पुढच्या तासाभरात कोशिंबीर, आमटी किंवा इतर कोणत्याही पदार्थात वापरून टाका.
जर कांदा फ्रिजमध्ये ठेवणे खूपच गरजेचे असेल, तर तो सुक्या कपड्याने पुसून एका घट्ट बंद होणाऱ्या एअर टाईट प्लास्टिक किंवा काचेच्या डब्यात ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी लगेच वापरावा.
हेही वाचा – Oil Free Puri in Cooker: ‘या’ ट्रिकने कुकरमध्ये बनवा ऑईल-फ्री पुऱ्या
Comments are closed.