झोप पूर्ण होऊनही दिवसभर थकवा जाणवतोय? हे आहे यामागील कारण
आपल्यापैंकी अनेकांना दररोज 7 ते 8 तास झोपूनही सकाळी उठल्यावर आळसपणा येतो, दिवसभरही थकवा जाणवतो. झोप पूर्ण होऊनही शरीरातील हा थकवा नक्की कशामुळे येतो, हे अनेकांना कळत नाही. तज्ज्ञांच्या मते, यामागे केवळ झोपेचे तास नसून आपली ‘रिकव्हरी सिस्टीम’ कारणीभूत असते. झोपूनही थकवा का येतो आणि यावर उपाय काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत.
थकव्याची कारणे –
सध्याच्या डिजिटल युगात सतत स्क्रीनसमोर आपण असतो किंवा तणावाखाली असतो. यामुळे आपली नर्वस सिस्टीम सतत उत्तेजित अवस्थेत असते, ज्यामुळे शरीर पूर्णपणे ‘रिचार्ज’ होऊ शकत नाही. परिणामी झोपेवर परिणाम होतो.
फक्त तास मोजून झोपणे पुरेसे नाही. निरोगी आरोग्यासाठी गाढ झोप लागणे महत्त्वाचे असते. रात्री झोपल्यावर जर तुमची झोप मध्येच वारंवार मोडत असेल तर मेंदूला विश्रांती मिळत नाहीय हे लक्षात घ्या.
शरीर हायड्रेटेड नसेल तर चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि थकवा जाणवतो.
शरीरात जीवनसत्वे किंवा लोहाची कमतरता असल्यास झोपूनही थकवा जाणवतो.
यावर सोपे उपाय:
डिजिटल डिटॉक्स फॉलो करा. यासाठी झोपण्यापूर्वी किमान तासभर मोबाईल, लॉपटॉप आणि टीव्ही वापरू नका, कारण स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळे झोपेत व्यत्यय येतो.
दिवसातून थोडा वेळ तरी चालायला हवे, यामुळे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते.
दररोजची झोपण्याची आणि सकाळी उठण्याची सवय लावा.
रात्री जड पदार्थ खाऊ नका.
तज्ज्ञ काय सांगतात?
जर थकवा जास्त जाणवत असेल तर डॉक्टरांची भेट घ्यावी.
हेही वाचा – जीम, वॉकसाठी वेळ नाही? मग घरातच चाला 10,000 पावले
Comments are closed.