फ्रिजमध्ये ठेवूनही टोमॅटो सडतात, फॉलो करा या स्मार्ट ट्रिक्स

भारतीय घरांत टोमॅटो प्रत्येक भाजी, डाळीत किंवा सलाडमध्ये वापरलं जातं. त्यामुळे घरांतील फ्रिजमध्ये टोमॅटो नाही असं होणं कठीण आहे. पण आपण पाहिलं असेल की, उन्हाळ्यात टोमॅटो फ्रिजमध्ये लवकर खराब होतात. एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टोमॅटो टिकत नाहीत. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात टोमॅटो जास्त काळ टिकवण्यासाठी आणि ते सडण्यापासून वाचवण्यासाठी काही सोप्या आणि प्रभावी स्मार्ट ट्रिक्स पाहूयात,

टिश्यू पेपर

बाजारातून टोमॅटो आणले की सर्वप्रथम स्वच्छ धुवून कोरडे करावेत. यानंतर एका एअर टाइट कंटेनरमध्ये खाली टिश्यू पेपर ठेवून त्यावर टोमॅटो उलटे ठेवावेत आणि पुन्हा त्यावर टिश्यू पेपर ठेवावा.

हेही वाचा – घरच्या घरी तयार करा Herbal Clinic; कुंडीत लावा ही औषधी रोपं

तेलाचा वापर

टोमॅटो धुवून कोरडे झाल्यावर टोमॅटोच्या देठाला थोडं खाण्याचं तेल लावावं. हे तेल लावलेले टोमॅटो एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवावेत आणि फ्रिजमध्ये स्टोअर करावेत.

खोलीचे तापमान

टोमॅटो हिरवे असतील तर फ्रिजमध्ये ठेवू नयेत. असे टोमॅटो रूम टेंमरेचरवर साठवावेत. साठवताना त्याचे उलटे ठेवावेत म्हणजेच टोमॅटोच्या देठाचा भाग खाली ठेवावा.

हे टाळा –

फ्रिजमध्ये टोमॅटो उघडे ठेवू नयेत. यामुळे ते लवकर खराब होतात.

फ्रिजच्या दरवाजाच्या रॅकवर किंवा खालच्या भागात टोमॅटो साठवणे टाळावे.

या ट्रिक्स वापरून तुम्ही टोमॅटो जास्त दिवस फ्रेश ठेवू शकता.

हेही वाचा – रोज वापरत असलेल्या ‘या’ 6 वस्तूंमुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

Comments are closed.