सूर्यकुमार यादवनंतर टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण? ‘या’ खेळाडूंमध्ये रंगली शर्यत





मुंबई : भारतीय क्रिकेट घ लवकरच आयर्लंड आणि इंग्लंडचा दौरा करणार असून यासाठी संघात मोठे बदल केले जाण्याची शक्यात आहे. अशामध्ये टी 20 संघाचे कर्णधारपद हे चर्चेचा विषय ठरला आहे. कारण, सध्याचा कर्णधार सुर्यकुमार यादव याला हटवणार असल्याची चर्चा रंगली आहे. आतापर्यंत टी 20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याचा विजयी टक्केवारी ही 84 टक्के राहिली आहे. पण, सध्या झालेल्या आयपीएल 2026मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याचे कर्णधारपद काढून घेतले जाणार असल्याची चर्चा रंगली आहे.



Comments are closed.