FIFA World Cup 2026 मध्ये गाजणार भारतीय खेळाडू, कोणाचा कोणत्या संघात समावेश?
नवी दिल्ली : जगातील सर्वात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषकाचा (FIFA World Cup 2026) थरार लवकरच सुरु होणार आहे. 12 जून पासून फुटबॉलचा महाकुंभाला सुरुवात होणार असून ही स्पर्धा 39 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत 48 संघांमध्ये तब्बल 104 सामने खेळवले जातत. दर 4 वर्षांनी येणाऱ्या फिफा विश्वचषकाचे यंदाचे 23 वे वर्ष आहे. अशामध्ये एकदाही भारतीय संघ या स्पर्धेसाठी पत्र ठरलेला नाही. पण, यंदाच्या वर्षी काही भारतीय वंशाचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत.
निशान वेलुपिल्ले – ऑस्ट्रेलिया (Australia) : भारतीय वंशाचा युवा खेळाडू निशान वेलुपिल्ले हा ऑस्ट्रेलियाच्या संघातून (Socceroos) फिफा विश्वचषकामध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.
सॅम्युअल मौतौसामी – फ्रान्स/ इतर (France/Foreign) : सॅम्युअल हादेखील भारतीय वंशाचा आघाडीचा फुटबॉलपटू आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर परदेशी संघाचे प्रतिनिधित्व करत असून या विश्वचषकाचा भाग आहेत.
सरप्रीत सिंग – न्यूझीलंड (New Zealand) : ऑकलंडमध्ये पंजाबी आई-वडिलांच्या पोटी जन्मलेले सरप्रीत न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघातून खेळत आहेत. यापूर्वी 2018मध्ये ते आंतरमहाद्वीपीय चषक खेळण्यासाठी मुंबईतही आले होते. तसेच, ते युरोपमधील प्रसिद्ध बायर्न म्युनिक (Bayern Munich) क्लबसाठीही खेळले आहेत.
तहसीन मोहम्मद जमशेद – कतार (Qatar) : केरळमधील कालिकत येथे मूळचा असलेला तहसीन, कतारच्या 26 सदस्यीय मुख्य संघातून मैदानात उतरणार आहेत. त्यांचे वडील स्वतः एक फुटबॉलपटू होते आणि त्यांचे भारताकडून खेळण्याचे अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांचा मुलगा आता पूर्ण करत आहे.
Comments are closed.