जाणून बुजून निवृत्ती स्वीकारणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआयची करडी नजर, नवीन नियम आणण्याच्या तयारीत




निवृत्ती स्वीकारून विजय शंकर श्रीलंका प्रिमीयर लीगमध्ये खेळण्यासाठी गेल्याने बीसीसीआय निवृत्तीसंदर्भात नवीन नियम आणण्याच्या तयारीत


नवी दिल्ली : सध्याच्या नियमांनुसार, भारतीय नियामक मंडळाच्या (BCCI) परवानगीशिवाय कोणताही सक्रिय भारतीय खेळाडू, मग तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असो, देशांतर्गत क्रिकेट खेळत असो किंवा केवळ आयपीएल खेळत असो, असा खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळू शकत नाही. त्यामुळे टीम इंडियात संधी न मिळणारे भारतीय खेळाडू लवकर निवृत्ती स्वीकारून परदेशातील लीगमध्ये खेळताना दिसतात. त्यामुळे आता बीसीसीआय अशा खेळाडूंवर नजर ठेवणार असून लवकरच निवृत्तीसंदर्भात नवीन नियम आणण्याच्या तयारीत आहे.



Comments are closed.