किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा दिमाखात साजरा, लाखो शिवप्रेमींनी लावली हजेरी





मुंबई : किल्ले रायगडावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला देशभरातून हजारो शिवप्रेमींची मांदियाळी राजगडावर जमली होती. ऐतिहासिक किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. ढोल, ताशे, नगाऱ्यांच्या गजराने गडावर मंगलमय वाटवरण निर्माण झाले होते. शाहिरांच्या पहाडी आवाजाने आसमंत दुमदुमून गेला. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो शिवप्रेमींनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना युवराज संभाजी राजे यांनी सामाजिक बदलासाठी शिवचारित्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.



Comments are closed.