वाढत्या वयात हवीये मनशांती ? मग आजच सोडा या गोष्टी

वाढणारं वय सोबत येताना विचारांची परिपक्वताही घेऊन येतं. त्यामुळे तरुण असताना गरजेच्या, आवश्यक वाटणाऱ्या बऱ्याच गोष्टी वाढत्या वयात अनावश्यक वाटू लागतात. अनुभवाने शहाणपण आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकवेळी आपणच जिंकाव हे गरजेचं नाही वाटत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासाऱखीच व्हावी असं आता वाटत नाही. कारण वाढणारं वय मनशांतीसाठी बऱ्याच गोष्टी सोडून द्यायलाही शिकवतं. पण हे एकदम होत नाही तर हळूहळू मनाला तशी सवय लावावी लागते. त्यासाठी काय करावं ते बघूया.

ज्यांना समजूनच घ्यायचं नाही त्यांना समजावणं सोडून द्या
जर तुम्ही एखाद्याला अनेकवेळा समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय पण तरीही त्याला समजत नसेल तर त्याला समजावणे सोडून द्या. प्रत्येकाचे विचार बदलणे तुमच्या हातात नाही हे समजा.

मुलांना कंट्रोल करणं
जसे जसे तुमचे वय वाढते तसे तसे मुलांचेही वय वाढते. त्यामुळे वयात आलेली मुलं स्व:तचे निर्णय स्व:त घेऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांची व्यर्थ चिंता करणे सोडून द्या. विश्वास ठेवा.

प्रत्येकाशी तुमचे विचार जुळतील असे नाही
बऱ्याचवेळा आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या काहींपैकी आपलं जमत तर काहींबरोबर अजिबात जमत नाही. त्याचे वाईट वाटून घेऊ नका. सोडून द्या.

पाठीमागे निंदा करणारे
वयाच्या एका टप्प्यावर तुमची निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात करा. मन शांत ठेवा.

भविष्याची चिंता सोडा
ज्या गोष्टींवर तुमचे निंयत्रण नाही त्या सोडून द्या. भविष्यात काय होणार हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळे उद्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवू नका.

जमेल तेच करा
इच्छा असणं आणि क्षमता असणं यात फरक असतो. त्यामुळे एखाद काम जमलं नाही तर निराश होणं सोडून द्या. प्र्त्येक व्यक्तीच्या आपल्या सीमा असतात.

तुलना करू नका
प्रत्येक व्यक्तीचे पद, प्रश्न आणि क्षमता वेगळी असते. त्यामुळे दुसऱ्यांबरोबर कधीही स्व:तची तुलना करू नये.

अपेक्षा ठेवू नका
जितक्या दुसऱ्यांकडून अपेक्षा अधिक तितकी निराशा. त्यामुळे जर शांत आयुष्य जगायचं असेल तर कोणाकडूनही अपेक्षा ठेवू नका.

Comments are closed.