जमिनीच्या खालून वाहणारी नदी
भारत हा सुजलाम सुफलाम राष्ट्र आहे. यामुळे आपल्या देशात नैसर्गिक साधनं मुबलक आहेत. यात प्रामुख्याने वर्षानुवर्ष वाहणाऱ्या सरस्वती नदीला विशेष महत्व आहे. अनेक पौराणिक कथांमध्येही सरस्वती नदीचा उल्लेख सापडतो. यामुळे असे मानले जाते की सरस्वती नदी एकेकाळी उत्तर पश्चिम भारतात वाहायची. पण नंतर हळूहळू ती गायब झाली. पण जाणकारांच्या मते सरस्वती नदी भूमिगत रुपाने आजही वाहत आहे.
यामुळेच सरस्वतीला भारताची हरवलेली नदी असे संबोधले जाते. वैज्ञानिकांच्या मते उत्तर आणि पश्चिम भागातील काही भागात भूमिगत झालेल्या सरस्वती नदीचे अस्तित्व आजही दिसते. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या भौगोलिक बदली दरम्यान नदीच्या प्रवाहाचे मार्ग बदलले. प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगम होतो. येथे गंगा यमिना नदीचे पाणी जरी दिसत असले तरी भूमिगत झालेली सरस्वती नदी या दोन्ही नद्यांना अदृश्य रुपात भेटते. सैटेलाईट मॅपिंग आणि भूवैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात ही गोष्ट स्पष्ट झाली आहे.
बद्रीनाथजवळ माना गावाजवळ एक नदी असून स्थानिक तिला सरस्वती म्हणतात. ही नदी हिमालय, पर्वतरांगामधून वाहते.मात्र नंतर प्रसिद्ध भीम पूलाजवळ जमिनीत ही नदी लुप्त होते. मात्र तज्ज्ञांनी हरियाणा आणि पंजाबमधील मैदानी प्रदेशात या प्राचीन नदीच्या मार्गांचा शोध लावला. त्यात घग्गर नदी हा सरस्वती नदीचाच भाग असल्याचे मानले जाते. तर राजस्थानमधील थारच्या वाळवंटात गोड पाण्याचे तळ सापडले आहेत.
Comments are closed.