बिगर भाजप मुख्यमंत्र्यांकडून मोदींचं कौतुक
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (10 जून) देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा अनेक दशकांचा विक्रम मोडला. ही यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम’ येथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) मित्रपक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक तपपूर्तीनिमित्त मित्रपक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचा विशेष सत्कार केला. यानंतर आज (11 जून) आणखी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी काही बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता.
Comments are closed.