आज BKC मध्ये साजरा झाला No Car Day, MMRDA च्या आवाहनाला अनेकांचा मोठा प्रतिसाद; पहा फोटोज
मुंबई : वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) दर शुक्रवारी साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन (Public Transport Day or No Car Day) साजरा करण्याचे आवाहन मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात (BKC) असणाऱ्या संस्थांना व कंपन्यांना केले होते. या आवाहनाला शुक्रवारी (12 जून) या पहिल्या दिवशीच तेथील संस्थांनी व कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी यावेळी सार्वजनिक वाहतूक म्हणजेच बेस्ट, मेट्रो, रेल्वे, टॅक्सी-रिक्षाचा वापर करत प्रवास केला.
Comments are closed.