टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत भारत – पाकिस्तानच्या महिला खेळाडूंमध्ये महामुकाबला




टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत भारत – पाकिस्तानच्या महिला खेळाडूंमध्ये महामुकाबला


टी-20 विश्वचषक 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात झाली आहे. 5 जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. यंदा प्रथमच 12 संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, त्यामुळे ही आतापर्यंतची सर्वात मोठी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा ठरणार आहे. भारताचा पहिला सामना आज रविवार (14 जून) होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय महिला खेळाडू आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत खेळणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता एडजबॅस्टन स्टेडियमवर हा सामना खेळण्यात येणार आहे. गेल्या टी-20 विश्वचषकात भारताने उपांत्य फेरी गाठली होती, तर पाकिस्तान गट फेरीतच बाहेर पडला होता.



Comments are closed.