रात्रीच्या वेळी दही खाणे योग्य की अयोग्य ?





रात्रीच्या वेळी दही खावे की नाही हा असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. कारण आपल्या घरातील ज्येष्ठमंडळी रात्री दही खावू नये हे आपल्याला कायम सांगत आली आहे. पण आताचे डॉक्टर मात्र रात्री दही खाण्यास हरकत नाही असे सांगत असल्याने नक्की काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याच उत्तर पाहणार आहोत.

तर तज्ज्ञांच्या मते दही खाणे हे चांगलेच आहे. कारण दह्यातील प्रोबायोटीक्समुळे खाल्लेल्या अन्नाचे लवकर पचन होते. पण हा नियम सगळ्यांसाठी लागू होत नाही. कारण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. परिणामी प्रत्येकाची अन्न पचवण्याची प्रक्रिया वेगळी असते. पाचनशक्ती वेगळी असते. यामुळे रात्री दही खाल्ले तर सगळ्यांनाच सर्दी , खोकला होईल असा विचार करणे चुकीचे असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.ज्यांना लैक्टोझ इनटोलरन्सचा त्रास आहे अशांना रात्री दही खाल्ल्यास पोट फुगणे, उलटी, जुलाब, गॅसचा त्रास होऊ शकतो. तसेच रात्री जेवल्यानंतर लगेच दही खाल्ले तरी त्याचा पचनशक्तीवर परिणाम होतो. कारण रात्रीच्या वेळीस पचनशक्ती मंदावते.

तज्ज्ञांच्या मते दही नेहमी घट्ट ,दाट असते. त्यामुळे ते पचायला वेळ लागतो. त्यामुळे जर जेवल्यानंतर दही खाल्ले आणि लगेच तुम्ही झोपायला गेलात तर पोटातील अॅसिड रिफ्लक्स होते. छातीत जडपणा येतो. दह्याचे पचन न झाल्याने ते आतड्यात पडून राहते. त्यामुळे गॅस निर्माण होतो.

यामुळे बाहेरील पॅक्ड दही न खाता घरात लावलेले दही खावे.
जर तुम्हाला दुग्धजन्य पदार्थांचा त्रास असेल तर रात्री दही खाणे टाळावे.



Comments are closed.