गंजलेल्या चाकूने भाज्या आणि मांस कापणे आरोग्यासाठी धोकादायक





आपण सगळेचजण कधी न कधी हॉटेलमध्ये जेवायला जातो किंवा जेवण बाहेरून ऑर्डरही करतो. ग्राहक म्हणून आपली पसंती स्वच्छ, हाय फाय इंटीरियर असलेल्या हॉटेल्सला अधिक असते. पण तुम्ही कधी त्या हॉटेलच्या किचनमध्ये डोकावले आहे का ? जिथे जेवण बनवले जातं ते किती स्वच्छ, टापटीप आहे याकडे आपण कधी लक्ष दिले आहे का? तर याच उत्तर नाही असचं आहे. पण नुकतचं फूड सेफ्टी अँड स्टैंडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने(FSSAI)एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यात त्यांनी देशातील अनेक हॉटेल्स, ढाबे आणि फूड स्टॉल्सची तपासणी केली असता त्यात एक धक्कादायक बाब समोर आली. या तपासणीत वरील ठिकाणांपैकी काही ठिकाणी अस्वच्छ तुटलेल्या , गंजलेल्या चाकूने भाज्या, मांस ,मच्छी कापले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर FSSAIने अशा गंजलेल्या चाकूने खाद्यपदार्थांच्या कापण्यावरच बंदी घातली आहे. त्यासाठी खाद्य बिझनेस करणाऱ्यांसाठी नियमावली देखील जारी केली आहे. यामुळे गंजलेल्या चाकू वापरल्याने आरोग्य कसे धोक्यात येऊ शकते हे समजून घेण सगळ्यांसाठी महत्वाचे आहे.

लोखंडाचे कण
गंजलेल्या चाकूने पदार्थ कापल्यास त्यातील लोखंडाचे सूक्ष्म कण त्या पदार्थास लागतात. तो पदार्थ आपण खाल्ल्यास लोखंडाचे कण थेट पोटात जातात. त्यामुळे इन्फेकश्न पोटदुखी यासारख्या गंभीर समस्या उद्दभवतात.

बॅक्टेरिया

अनेकवेळा तुटलेल्या चाकूमध्ये फटी असतात. या फटींमध्ये कापलेल्या पदार्थाचे कण फसलेले असतात.त्यात बॅक्टेरिया तयार होतात. त्यामुळे ज्यावेळी या तुटलेल्या चाकूने पदार्थ कापला जातो तेव्हा त्यात बॅक्टेरिया सहज प्रवेश करतात. आपण तोच पदार्थ खातो. त्यामुळे फूड पॉयझनिंगसारखा त्रास होऊ शकतो.

रसायने
काही चाकूवर रंगाचे कोटींग असते. हा रंग जर हलक्या दर्जाचा असेल तर तो लवकर उतरतो. प्रामुख्याने ओलसर पदार्थ जसे भाजी, सॅलेड, फळ, मांस कापताना रंग त्या पदार्थात सहज मिसळतो.



Comments are closed.