‘प्रीतम आणि पेड्रो’बद्दल विक्रांत मॅसीने शेअर केला अनुभव, म्हणाला…




Vikrant Messi Pritam And Pedro


जिओहॉटस्टार प्रेक्षकांसाठी एक धमाल सायबरक्राईम कॉमेडी-ड्रामा घेऊन येत आहे, जो 3 जुलैला एक्सक्लुझिव्ह प्रीमियर होणार आहे.

विक्रांत मेस्सी

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सहकार्याने तयार झालेली ही मालिका रहस्य आणि विनोद यांचा सुंदर संगम आहे.

एक अनोख्या जोडगोळीचा प्रवास यात दाखवला आहे, जी वेगवेगळ्या सायबरक्राईम केस सोडवताना प्रेक्षकांना खिळवून ठेवेल.

मालिकेच्या आगमनाने प्रेक्षकांमध्ये ‘प्रीतम आणि पेड्रो’मधील रहस्य उलगडण्याची उत्सुकता वाढली आहे.

राजकुमार हिरानींसोबत ‘प्रीतम आणि पेड्रो’वर काम करण्याचा अनुभव सांगताना विक्रांत मॅसी म्हणाला की, “हिरानींच्या चित्रपटांमध्ये खलनायक कधीच व्यक्ती नसतो; तो नेहमी परिस्थिती असतो. त्यांच्या चित्रपटांमध्ये तुम्ही खलनायकाला खरं तर कधीच द्वेष करू शकत नाही”. त्यांच्या विचारांमधून राजकुमार हिरानींच्या कथाकथनाची खोली स्पष्ट होते, जिथे मानवता नेहमीच केंद्रस्थानी असते.

एकदरंच, ‘प्रीतम आणि पेड्रो’च्या प्रीमियरसाठी तयारी सुरू असताना प्रेक्षकांना रहस्य, विनोद आणि भावना यांचा सुंदर मेळ अनुभवायला मिळणार आहे.

हेही वाचा – रणवीर सिंगने ‘आरी आरी’ गाण्याचा अंदाजच बदलला – शाश्वत सचदेव



Comments are closed.