दिवसा गायब असलेली झुरळ रात्री किचनमध्ये कुठून येतात ?

घर लहान असो किंवा मोठं झुरळांचा वावर ही प्रत्येक घराची समस्या आहे. झुरळ घरात फक्त घाणच करत नाही तर सोबत अनेक बॅक्टेरिया आणि अॅलर्जीही घेऊन येतो. पण विशेष म्हणजे दिवसा गायब असलेली ही झुरळ रात्री मात्र अचानक किचन आणि बाथरुममध्ये दिसतात. त्यामुळे त्यामुळे झुरळांना घालवण्यासाठी घरात कितीही स्प्रे केला तरी काही ठराविक दिवसांनंतर ते परत येतात.

कारण झुरळ खूप हुशार असतात. दिवसा ते अशा अंधाऱ्या, कमी उजेड असलेल्या ठिकाणी लपून बसतात जिथे ते कोणालाही सहज दिसू शकत नाहीत. पण रात्री उशीरा ते घरातील माणसांचा कमी वावर असलेल्या किचन आणि बाथरुममध्ये येतात.

किचन सिंकच्या खाली झुरळांचे लपण्याचे ठिकाण आहे. कारण किचनमधील सिंकमध्ये पाण्यामुळे दमटपण असतो.त्यामुळे झुरळांना येथे लपायला आवडते.

तसेच ड्रेनज लाईन, भिंतीमधील कपारी, इलेक्ट्रीक बोर्ड, जुने रद्दी पेपर, पिशव्या, येथे झुरळ सर्वाधिक आढळतात.

किचन कॅबिनेट स्टोरेज खास करून जिथे डाळी, कडधान्य ठेवलेली असतात त्यांच्या सुगंधाने झुरळ आकर्षित होतात.

या झुरळांना हटवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणे गरजेचे आहेच. पण पेस्ट कंट्रोल केल्यानंतरही झुरळ येत असतील तर काय उपाय करावे ते बघूया.

किचन, बाथरुममद्ये ओल ,दमट पणा राहू नये यासाठी ही जागा कोरडी ठेवा.

किचन नेहमी स्वच्छ ठेवावं. डायनिंग टेबल , किचन प्लेटफॉर्म स्वच्छ धुवावेत. उष्टी खरकटी भांडी ठेवू नयेत.

धान्य, कडधान्य किंवा खायचे पदार्थ कधीही उघडे ठेवू नयेत.

किचनमध्ये झुरळ मारणारे स्प्रे , जेल मिळतात. त्यांचा वापर करावा.

Comments are closed.