उष्णतेमुळे युरोपमधले रस्ते-सिग्नल वितळले; भीषण परिस्थितीचे फोटो व्हायरल
युरोप म्हटलं की डोळ्यांसमोर थंड वातावरण, बर्फवृष्टी, हिरवीगार मैदानं आणि सततचा रिमझिम पाऊस उभा राहतो. मात्र, सध्या येथील वातावरण काही वेगळंच आहे. येथे यंदा उष्णतेचा कहर झाला असून तापमान 40 ते 42 अंशांवर पोहोचल्याने अक्षरश: रस्ते आणि ट्रॅफिक सिग्नल वितळू लागल्याची धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

एरवी आल्हाददायक आणि थंड वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या जर्मनी, इटलीसह अनेक युरोपीय देशांना सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेने वेढले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

भारतात 40 अंश सेल्सियस तापमान सामान्य वाटत असले तरी याच तापमानामुळे युरोपमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. युरोपीय देश फ्रान्स, जर्मनी, पोलंड, ब्रिटन येथे उष्णतेच्या लाटांमुळे जवळपास 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

युरोपमधील अनेक रस्ते, रेल्वे रूळही वितळले आहेत. जंगलांना आग लागत असून नागरिकांना घराबाहेर पडू नये असे सांगण्यात येत आहे.

सध्या युरोपमधील या भीषण वास्तव्याचे अनेक व्हिडीओ , फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा – जर्मनी, इटलीसह अख्ख्या युरोपमध्ये उष्णतेचा कहर! बळी किती? कारण काय?
Comments are closed.