पावसाळ्यातली सेफ ड्रायव्हिंग

पावसाळ्यात ड्रायव्हिंग करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण या दिवसातली ड्रायव्हिंग ही सामान्य दिवसांपेक्षा कठीण असते. कारण पावसामुळे ठिकठिकाणी साचलेलं पाणी, रस्त्यावर पडलेले खड्डे, झाड, माणसांची गर्दी, गाड्यांच्या रांगा यातून आपली गाडी बाहेर काढणं म्हणजे ड्रायव्हिंग करणाऱ्याच्या संयमाची कसोटीच. यामुळे पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना सावध राहणे आणि सेफ ड्रायव्हिंगचे  नियम पाळणे सगळ्यांनी फॉलो करायलाच हवे.

पावसाळा सुरू होण्याआधीच कार सर्विंसिंग करून घ्यावी. इंजिन ऑईल,एयर आणि फ्युल फिल्टरही बदलावे. तसेच संस्पेंशन जाींट, सायलेंसर पाईपही तपासून घ्यावे.

पावसाळ्यात सगळीकडे माती आणि चिखल पसरलेला असतो. त्यामुळे टायर स्लिप म्हणजे घसरण्याची शक्यता असते. ते टाळण्यासाठी ४-५ वर्ष जुने टायर असतील तर ते बदलून टाकावे. स्टेपनी दुरुस्त करून घ्यावी.

कारचे लाईटसही चेक करून घ्यावेत. जर लाईटमध्ये क्रॅक अलेस तर त्यात पावसाचे पाणी जाऊन शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात बऱ्याचदा ट्रॅफीक जाम होते. अशावेळी अनेकजण शॉर्ट कटच्या नादात नव्या रस्त्यांची वाट धरतात. पण पावसाळ्यात असे धाडस सहसा करूच नये. कारण जर ज्या रस्त्यावरून तुम्ही जात आहात त्याची माहीतीच तुम्हाला नसेल तर तुमच्यासाठी तो नवा मार्ग डोकेदुखी ठरू शकेल.

पावसाळ्यात बाहेर जाताना गाडी आतून स्वच्छ करावी. फूटकव्हर वर कागद ठेवावे. कागद बदलत राहावे. त्यामुळे गाडीत बूट,चपल, चिखलाचे डाग राहत नाहीत.

पावसाळ्यात जर तुम्ही भिजलेल्या अंगानेच गाडीत बसलात तर गाडीची सीटही भिजते. कोरड्या फडका असल्यास सीट पुसून कोरडी करावी. सीट ओली ठेवली तर सीटच्या हँडल्सला गंज लागू शकतो.

जर पावसाळ्यात तुम्ही गाडीतून लहान मुलांना घेऊन जाणार असाल तर गाडीत पाण्याच्या बाटल्या, बिस्किट, फळ, चिप्स असा खाऊ ठेवावा.

पावसाळ्याच्या दिवसात गाडीत एक छत्री आणि एक टॉवेल , रेनकोट असायलाच हवा.

जर तुम्ही लॉंग ट्रॅव्हलसाठी जात असाल तर गाडीत , लायटर,टॉर्च, शिट्टी ठेवाच. अडचणीत मदत मिळवण्यासाठी या वस्तू उपयोगी पडतात.

जर पावसात गाडी चिखलात फसली तर संबंधित कंपनीला कॉल करून मदतीसाठी बोलवावे.

Comments are closed.