वर्कींग वुमन्ससाठी ५ मिनिटांची मानस पूजा





घर सांभाळून नोकरी करणाऱ्या वर्कींग महिलांना अनेक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. अशावेळी मन शांती देणाऱ्या रोजच्या देवपूजेला कसा वेळ द्यावा हा प्रश्न महिलांना पडतो. पण तुम्हाला माहीत आहे का की अध्यात्माशी एकरुप होण्यासाठी नेहमी तासन्तास पूजा करण्याची, मंदिरात जाण्याची गरज नसते. तर तुम्ही दररोजच्या धावपळीत कुठेही कधीही मानस पूजा करूनही देवाची अर्चना करू शकता.

मानसपूजा

मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात देवपूजा करणे. त्यासाठी कोणत्याही पूजा सामग्रीची गरज नसते. तर मनातल्या मनातच देवपूजा केली जाते. मनातच देवाल जल, फूल,नैवेद्य अर्पण केला जातो. अशाप्रकारे मनातून केलेली पूजा देवापर्ंयत लवकर पोहचते असे मानले जाते.

शांत बसावे
या पुजेसाठी एका जागी शांत बसावे. २-३ वेळा दीर्घश्वास घ्यावा. मन शांत करावं.

इष्ट देवाचे ध्यान
डोळे बंद करून देवाचे रुप आठवावे. मंदिरात बसलोय असे समजून ध्यान करावे.मं

मनात पूजा

डोळे बंद करून मनातच देवाल जल, दूध, फूल, चंदन, प्रसाद वाहत आहोत असे समजावे.

मंत्र जप
मानस पूजा झाल्यानंतर मंत्र जप करावा.



Comments are closed.