घराच्या उत्तर दिशेला ठेवा या वस्तू; कुबेर देवता म्हणेल तथास्तु !

वास्तुशास्त्रामध्ये घराच्या उत्तर दिशेला अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आलं आहे. असं सांगितलं जातं की याच दिशेकडून घरात सकारात्मक ऊर्जा आणि धनाचे आगमन होत असते. जर तुम्हाला वारंवार आर्थिक अडचणी जाणवत असतील तर या दिशेचे काही वास्तुनियम पाळल्यास नक्कीच परिस्थिती सुधारू शकते. आजच्या लेखात घराच्या उत्तर दिशेला कोणत्या वस्तू ठेवल्याने कुबेर देवाचा आशीर्वाद मिळेल हे पाहूयात. vastu shastra for home

वास्तूच्या नियमांनुसार घरामध्ये पाण्याचा वाहता कारंजे ठेवणे हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. फक्त या कारज्यांतील पाणी स्वच्छ असावे आणि सतत वाहते असावे.

आरसा लावणे घरात सकारात्मक ऊर्जा देणारे असते. परंतू हा आरसा नेहमी स्वच्छ असावा, त्यावर कोणत्याही प्रकारचे डाग साचू देऊ नका.
उत्तर दिशेला कुबेर यंत्र ठेवणे फलदायी आहे. हे यंत्र संपत्तीला आकर्षित करण्यासाठी असते.
वास्तुशास्त्रानुसार कपाट म्हणजेच लॉकर नेहमी दक्षिण दिशेच्या भिंतीला लावून अशा प्रकारे ठेवावे, कारण उत्तर दिशेला लक्ष्मी देवी आणि कुबेर देवाचा निवास असतो.

हेही वाचा – सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी प्रभावी वास्तू उपाय

(टीप – वरील माहिती विविध स्त्रोतावरून घेण्यात आली आहे. आपलं महानगर Live आणि only मानिनी याची पुष्टी करत नाही.)

Comments are closed.