मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शरद पवार अन् नारायण राणे यांची एकत्र बैठक; नेमकं काय ठरलं?





मुंबई : गेल्या काही महिन्यात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबवत असल्याचे समोर आले, दुसरीकडे महायुतीकडून उपरेषण तुतारी राबविण्यात येणार का? अशा काही चर्चा सुरु होत्या. अशामध्ये, बुधवारी (8 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे प्रदीर्घ काळानंतर अधिवेशन सुरु असताना विधान भवनात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नारायण राणे असे सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक झाली. याला सीमाप्रश्नाची पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात आले असून हे सर्व नेते एकत्र आल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात आले.



Comments are closed.