देशात धावणार पहिली हायड्रोजन ट्रेन; पंतप्रधान मोदी 17 तारखेला दाखवणार हिरवा झेंडा
नवी दिल्ली : भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ धोरणांतर्गत विकसित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हायड्रोजन ट्रेनचे 17 जुलै रोजी उद्घाटन होणार आहे. हायड्रोजन ट्रेनचे उद्घाटन झाल्यानंतर भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नवीन पर्वाची सुरुवात होईल. सुरुवातीला ही ट्रेन ताशी 75 किमी वेगाने धावेल आणि भविष्यात तांत्रिक अनुभवाच्या आधारे तिच्या सेवांचा विस्तार केला जाईल.
Comments are closed.